अधिक पावसाच्या प्रदेशांत निरोगी रहाण्यासाठी दिवसभरात केवळ २ वेळा आहार घ्या !

पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते.