परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सलग ३ वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन रामप्रहरी मिळाला. त्या वेळी त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुष्कळ ज्ञान दिले.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे आणि राष्ट्र, धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे..

सत्संग १२ : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व

आज आपण स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व काय आहे ?, हे जाणून घेणार आहोत. कोणत्याही साधनामार्गाने साधना केली, तरी स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलन झाल्याशिवाय साधनेत प्रगती होत नाही. साधनेत प्रगती होणे म्हणजे काय, तर आपला मोक्षाच्या दिशेने प्रवास होणे ! परिस्थिती कशीही असली, तरी आतून आनंद अनुभवता येणे !

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

रात्री उशिरा जेवण केल्याने लोकांना ‘ब्रेस्ट’ आणि ‘प्रोस्टेट’ कर्करोग होऊ शकतो, असे ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’च्या एका अहवालामध्ये देण्यात आले आहे. हे संशोधन खाणे आणि पिणे यांच्या सवयींच्या एका माहितीवर आधारित आहे.

मेंदूवरील शस्त्रकर्माच्या वेळी रुग्ण महिलेकडून श्रीमद्भगवद्गीतेच्या श्‍लोकांचे पठण !

सूरत येथील ३६ वर्षीय महिला शस्त्रकर्माच्या सवा घंट्यामध्ये सतत श्रीमद्भगवद्गीतेतील श्‍लोकांचे पठण करत होत्या..

नियमितपणे प्राणायाम, व्यायाम आणि योगासने करून शरिराची प्रतिकारक्षमता वाढवा !

व्यावहारिकदृष्ट्या जसे अर्थार्जनासाठी देह झिजवणे आवश्यक आहे, तसे आपला देह चालण्यासाठी त्यामध्ये योग्य प्रमाणात प्राणशक्ती (चेतनाशक्ती) प्रवाहित होणे आणि तिचे नियमन होणे अत्यावश्यक आहे. यासाठी संतुलित आहाराचे सेवन, योग्य दिनचर्येचे पालन आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक असते.

सत्संग ११ : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची तोंडओळख

मागील सत्संगात आपण भाव म्हणजे काय ?, भाव आणि भावना यांमध्ये असलेला भेद , तसेच भावजागृतीच्या प्रयत्नांमध्ये मानसपूजेचे महत्त्व आणि ती कशी करायची हे समजून घेतले होते. ‘भाव तेथे देव’ असल्याने नामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांच्या जोडीला मानसपूजा असे भावजागृतीचे प्रयत्न करून भगवंताच्या अखंड अनुसंधानात रहाणे कसे शक्य होते याविषयी शिकलो. आज आपण स्वभावदोष निर्मूलन करण्याचे महत्त्व विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

सत्संग १० : भावजागृतीचे प्रयत्न, मानसपूजा

कोणत्याही साधनामार्गाने साधना केली, तरी स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलन झाल्याशिवाय साधनेत प्रगती होत नाही. सोप्या भाषेत समजून घ्यायचे, तर आध्यात्मिक उन्नती म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत उन्नती होणे. ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर दोषरहित आणि गुणवान ईश्वराप्रमाणे होण्यासाठी स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सत्संग ९ : साधनेची अंगे

मागील सत्‍संगात आपण सत्‍संग म्‍हणजे काय ? आणि सत्‍संगाचा आपल्‍याला कसा लाभ होतो ? याविषयी समजून घेतले होते. आजच्‍या सत्‍संगात आपण साधनेची अंगे कोणती आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

वर्ष २०२१ मध्ये येणार्‍या ‘गुरुपुष्यामृत योगां’विषयीची वैशिष्ट्ये !

गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यासाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.