अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेचा ‘सनातन फायनान्सर अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’शी कोणताही संबंध नाही ! – सनातन संस्थेचा खुलासा

‘सनातन संस्था’ ही आध्यात्मिक (अध्यात्मप्रसार करणारी) संस्था असून तिचा कुठल्याही प्रकारे या आर्थिक अस्थापनाशी संबंध नाही, तसेच सनातनचा एकही साधक या आर्थिक आस्थापनाशी संबंधित नाही.

उजनी धरणाने गाठला तळ

पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिले आहे, तर दळणवळण बंदीमुळे इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

‘म्युकरमायकोसिस’ आजाराची पहिली रुग्ण महिला !

कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ नावाचा आजार आढळून येत आहे. हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ; पण अत्यंत घातक संसर्ग आहे. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही, तर, मेंदू, हिरड्या, छाती तसेच शरिरात कुठेही होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तसेच या आजाराचे प्रमाण वाढण्याची भीतीही तज्ञांनी व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भर उन्हाळ्यात नद्यांना पूर

जिल्ह्याच्या काही भागांत ९ मे या दिवशी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता.

चीनची गलवान खोर्‍यात युद्धसिद्धता !

भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जात असतांना चीनने पूर्व लडाखमधील सीमेवर युद्धाची सिद्धता केली आहे, असे दिसून येत आहे. चीनने घातकी आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे अत्याधुनिक ‘पी.एच्.एल्.-३’ हे रॉकेट लाँचर्स तिबेटच्या भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. चीनची सरकारी दूरचित्रवाहिनी सीसीटीव्हीने याविषयीचे वृत्त दिले आहे.

कोयना नगर (जिल्हा सातारा) येथील धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोयना नगर येथील कोयना धरण परिसराला भूकंपाचे २ सौम्य धक्के बसले. ८ मे या दिवशी दुपारी १.५५ वाजता पहिला धक्का, तर १.५८ वाजता दुसरा धक्का बसला.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘श्रीविष्णूची शक्ती’, म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या अवतार असल्याचे सांगितले आहे.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.

हिमालयातील बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात सिद्ध होत आहेत तलाव !

जगात गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बर्फाच्छादित डोंगर वितळत आहेत. भारतातील हिमालयातही हीच स्थिती आहे. यामुळे येथील तलावांमधील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच त्यांचा आकारही वाढत आहे.