गंधशास्त्राचा अभ्यास

श्री. आनंद जोग यांनी ‘नॉटीकल सायन्स’मध्ये शिक्षण घेऊन ‘नेव्ही’त काम केले आहे. कालांतराने अत्तरांची निर्मिती करणे, याकडे त्यांचे लक्ष केंद्रित झाल्याने आणि त्यांना मनापासून या गोष्टींची आवड असल्याने त्यांनी ‘पर्फ्युमरी’चे विविध कोर्स केले आहेत.

विविध रागांनुसार अत्तर

मेंदूच्या ज्या भागात आपल्या भावना आणि आठवणी निर्माण होतात, त्या भागाशी गंध जोडलेला आहे. त्यामुळे गंधाचे सगळ्यांत मोठे नाते आठवणींशी आहे.

गंधशास्त्र आणि संगीत

एखादा पदार्थ बनवतांना आपण त्यात चवीनुसार पदार्थ घालतो आणि ‘त्यात अजून काय घातले ?, तर तो आणखी चांगला होईल ?’, हे पहातो. गंधाचेही असेच असून स्वरांचे आणि स्वरगंधाचेसुद्धा तसेच आहे.