अंकोर वाट : राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने कंबोडिया येथे बांधलेले हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर !

हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर हिंदुबहुल भारतात नसून ते कंबोडियात आहे. त्या मंदिराचे नाव आहे अंकोर वाट !’

कंबोडिया बौद्ध राष्ट्र असूनही तेथील राजा नरोदोम सिंहमोनी यांच्या राजवाड्यात सर्व चिन्ह ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित असणे !

राजवाड्याचे वैशिष्ट्य असे आहे की, हा राजवाडा चीन आणि फ्रेंच वास्तूशैलीनुसार बांधला आहे; पण राजवाड्यातील सर्व चिन्हे ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित आहेत. राजवाड्याच्या परिसरात प्रवेश करतांना श्रीविष्णु आणि शिव एकत्र असलेल्या ‘हरिहर’ मूर्ती दिसतात.

सांप्रत बौद्ध राष्ट्र असूनही भगवान श्रीविष्णूवरील श्रद्धा दर्शवणार्‍या महाभारत आणि रामायण यांतील प्रसंगांवर आधारलेले कंबोडियाचे पारंपरिक ‘अप्सरा नृत्य’ !

महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहायचे. ‘खमेर नावाचे हिंदु साम्राज्य येथे वर्ष ८०२ ते १४२१ पर्यंत होते’, असे म्हटले जाते.

कंबोडिया येथे कुणीही ओळखीचे नसतांना ईश्‍वराच्या कृपेने प्रवासातच एका व्यक्तीने साहाय्यासाठी येणे, ही भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती !

बाली (इंडोनेशिया) येथून आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह कंबोडियाला जात होतो. त्या वेळी प्रवासात क्वालालंपूर येथे काही घंटे थांबावे लागले. तेथून कंबोडियाची राजधानी नोम फेन येथे जायचे होते.