योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

गाभार्‍यातील प्रसन्न, बोलकी, निरागस आणि वात्सल्यमय तेजस्वी मूर्ती योगतज्ञ दादाजींनी स्वत: जयपूर येथे जाऊन बनवून आणली आहे. २४.५.२००६ या दिवशी त्यांच्या हस्तस्पर्शाने दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगलमय वातावरणात झाला होता.

श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर !

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे. ‘येथे श्री दत्तगुरु प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात’, असे या क्षेत्राचे माहात्म्य आहे.

सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !

भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर !

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !

कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे.