प्रस्तूत लेखात नागपंचमीपूजनाच्या विधीचा दुसरा भाग दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास नागपंचमीपूजन अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.
या लेखाचा पहिला भाग, ‘नागपंचमीपूजन (अर्थासह) (भाग १)’ वाचण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

हळद मिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे. (अथवा नवनागांची चित्रे) चित्राच्या ठिकाणी पुढील नाममंत्रांनी नवनागांचे आवाहन करावे. उजव्या हातात अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ असे म्हणतांना नागदेवतेच्या चरणी अक्षता वहाव्यात.
ॐ अनन्ताय नमः । अनन्तम् आवाहयामि ।।
ॐ वासुकये नम: । वासुकिम् आवाहयामि ।।
ॐ शेषाय नम: । शेषम् आवाहयामि ।।
ॐ शङ्खाय नम: । शङ्खम् आवाहयामि ।।
ॐ पद्माय नम: । पद्मम् आवाहयामि ।।
ॐ कम्बलाय नम: । कम्बलम् आवाहयामि ।।
ॐ कर्कोटकाय नम: । कर्कोटकम् आवाहयामि ।।
ॐ अश्वतरये नम: । अश्वतरम् आवाहयामि ।।
ॐ धृतराष्ट्राय नम: । धृतराष्ट्रम् आवाहयामि ।।
ॐ तक्षकाय नम: । तक्षकम् आवाहयामि ।।
ॐ कालियाय नम: । कालियम् आवाहयामि ।।
ॐ कपिलाय नम: । कपिलम् आवाहयामि ।।
ॐ नागपत्नीभ्यो नमः । नागपत्नीः आवाहयामि ।।
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नम: । ध्यायामि ।
(अनंतादी नागदेवतांना नमन करून मी ध्यान करतो.)
१. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । आवाहयामि ।
(अनंतादी नागदेवतांचे आवाहन करतो.)
२. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना आसनाप्रती अक्षता अर्पण करतो.)
(अक्षता चित्रावर वाहाव्यात.)
३. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । पाद्यं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
४. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । अर्घ्यं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना अर्घ्यासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
५. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । आचमनीयं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना आचमनासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
६. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । स्नानं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना स्नानासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
७. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । वस्त्रं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना वस्त्र अर्पण करतो.)
(वस्त्र वहावे.)
८. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । उपवीतं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना उपवीत अर्पण करतो.)
(जानवे किंवा अक्षता वहाव्यात.)
९. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । चन्दनं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना गंध अर्पण करतो.)
(अनंतादी नवनागांना गंध-फुल वहावे.)
१०. नागपत्नीभ्योनमः । हरिद्रां समर्पयामि ।
(नागपत्नींना हळद वहातो.)
११. नागपत्नीभ्योनमः । कुङ्कुमं समर्पयामि ।
(नागपत्नींना कुंकू वहातो.)
१२. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना अलंकार म्हणून अक्षता अर्पण करतो.)
(अक्षता वाहाव्यात.)
१३. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पाणि तुलसीपत्राणि बिल्वपत्राणि दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि।
(अनंतादी नागदेवतांना सध्याच्या ऋतूत फुलणारी फुले तसेच तुळशीपत्रे, बेलाची पाने, दूर्वा अर्पण करतो.)
(फुले, हार इत्यादि वहावे.)
१४. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । धूपं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना धूप ओवाळतो.)
(उदबत्ती ओवाळावी.)
१५. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । दीपं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना दीप ओवाळतो.)
(निरांजन ओवाळावे.)
१६. ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । नैवेद्यार्थे पुरतस्थापित नैवेद्यं निवेदयामि ।
(अनंतादी नागदेवतांना समोर ठेवलेला नैवेद्य निवेदन करतो.)
(दूध-साखर, लाह्या यांचा तसेच कुलपरंपरेनुसार खीर इत्यादि पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.)
(उजव्या हातात दोन तुळशीची पाने घेऊन पाण्याने भिजवून घेऊन त्यांनी नैवेद्यावर पाणी प्रोक्षण करावे. तुळशीची पाने हातात धरुन ठेवावीत आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवावा, पुढील मंत्रातील ‘स्वाहा’ शब्द म्हणताना उजवा हात नैवेद्यापासून नागदेवतांच्या दिशेने पुढे न्यावा.)
प्राणाय स्वाहा ।
(हे प्राणासाठी अर्पण करत आहे.)
अपानाय स्वाहा ।
(हे अपानासाठी अर्पण करत आहे.)
व्यानाय स्वाहा ।
(हे व्यानासाठी अर्पण करत आहे.)
उदानाय स्वाहा ।
(हे उदानासाठी अर्पण करत आहे.)
समानाय स्वाहा ।
(हे समानासाठी अर्पण करत आहे.)
ब्रह्मणे स्वाहा ।
(हे ब्रह्माला अर्पण करत आहे.)
(हातातील एक तुळशीचे पान नैवेद्यावर आणि एक पान नागदेवतांच्या चरणी वहावे. पुढील मंत्रांतील ‘समर्पयामि’ म्हणतांना पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना नैवेद्य अर्पण करतो.)
मध्ये पानीयं समर्पयामि ।
(मध्ये पिण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
उत्तरापोशनं समर्पयामि ।
(आपोशनासाठी पाणी अर्पण करत आहे.)
हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
(हात धुण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
(तोंड धुण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।
(हाताला लावण्यासाठी चंदन अर्पण करत आहे.)
मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि ।
(मुखवासासाठी पान-सुपारी अर्पण करत आहे.)
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । मङ्गलार्तिक्यदीपं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना नमस्कार करून मंगलारती अर्पण करतो.)
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । कर्पूरदीपं समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना नमस्कार करून कापराची आरती ओवाळतो.)
(कापराची आरती ओवाळावी.)
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । नमस्कारान् समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना नमस्कार करतो.)
(साष्टांग नमस्कार घालावा.)
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना नमस्कार करून प्रदक्षिणा घालतो.)
(घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने, म्हणजे डावीकडून उजवीकडे वर्तुळाकार फिरत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.)
श्रावणे शुक्लपञ्चम्यां यत्कृतं नागपूजनम् ।
तेन तृप्यन्तु मे नागा भवन्तु सुखदाः सदा ।।
अज्ञानाज्ज्ञानतो वाऽपि यन्मया पूजनं कृतम् ।
न्यूनातिरिक्तं तत्सर्वं भो नागाः क्षन्तुमर्हथ ।।
युष्मत्प्रसादात्सफला मम सन्तु मनोरथाः ।
सर्वदा मत्कुले मास्तु भयं सर्पविषोद्भवम् ।।
(श्रावण शुक्ल पंचमीला मी हे जे नागपूजन केले आहे, त्या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणार्या होवोत. हे नागदेवतांनो, अज्ञानाने वा जाणतेपणी मी हे जे पूजन केले आहे त्यात काही उणे-अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी. तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथे पूर्ण होवोत. माझ्या कुळामध्ये कधीही सर्पविषापासून भय उत्पन्न होऊ नये.)
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । प्रार्थनां समर्पयामि ।
(अनंतादी नागदेवतांना नमस्कार करून प्रार्थना करतो.)
(हात जोडून प्रार्थना करावी.)
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
(हे परमेश्वरा, मी ‘तुला आवाहन कसे करावे, तुझी उपासना कशी करावी, तुझी पूजा कशी करावी’, हे जाणत नाही. त्यामुळे तू मला क्षमा कर.)
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
(हे देवेश्वरा, मंत्र, क्रिया अथवा भक्ती मी काहीच जाणत नाही, असे असूनही मी केलेली पूजा परिपूर्ण होऊन तुझ्या चरणी अर्पण होऊ दे.)
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये तत् ।।
(हे नारायणा, शरिराने, वाणीने, मनाने, (इतर) इंद्रियांनी, बुद्धीने, आत्म्याने अथवा प्रकृतीस्वभावानुसार जे जे मी करतो, ते ते मी तुम्हाला अर्पण करत आहे.)
अनेन कृतपूजनेन अनन्तादिनवनागदेवता: प्रीयन्ताम् ।
(या केलेल्या पूजनाने अनंतादी नागदेवता प्रसन्न होवोत.)
(असे म्हणून उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे आणि दोन वेळा आचमन करावे.)
सायंकाळी विसर्जनाच्या वेळी पुढील श्लोक म्हणून पूजन केलेल्या नागदेवतांच्या चरणी अक्षता वाहून विसर्जन करावे.
यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
(पूजा स्वीकारून सर्व देव इष्टकामसिद्धीसाठी पुन: येण्यासाठी आपापल्या स्थानी जावोत.)
टीप
१. काही ठिकाणी कुलपरंपरेनुसार सायंकाळी कथावाचन करून विर्सजन करतात. अशा काही परंपरा असल्यास त्याचे पालन करावे.
२. काही ठिकाणी पूजन करण्यासाठी घराबाहेर दाराच्या दोन्ही बाजूंना भिंतींवर नागदेवतांचे चित्र काढून पूजा करतात.
३. काही ठिकाणी प्रत्यक्ष नागाची पूजा केली जाते.
४. काही ठिकाणी एकाच नागाचे चित्र काढून पूजा केली जाते.
पूजनानंतर नागदेवतेला करावयाची प्रार्थना !
‘हे नागदेवतांनो, श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे, या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणार्या होवोत. हे नागदेवतांनो, मी हे जे पूजन केले आहे, त्यात अज्ञानाने वा अजाणतेपणी काही उणे-अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी. तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथे पूर्ण होवोत. माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’