ध्यानयोग

ध्यानधारणा करून ईश्वराशी अनुसंधान साधत अंतिमतः ईश्वरप्राप्ती करणे, याला ध्यानयोग म्हणतात. ध्यानयोग या योगमार्गात ‘कोणत्याही गोष्टीवर धारणा करून त्यावर मन एकाग्र करावे, म्हणजे हळूहळू ध्यानात परिपूर्णता येईल’, असे सांगितले आहे. या योगमार्गाची उत्पत्ती आणि माहिती या लेखात देण्यात आली आहे.

 

१. ध्यानयोग

त्रेतायुगात जिवाची ज्ञानमार्गाने ईश्वरप्राप्तीची ओढ
न्यून (कमी) झाल्यामुळे ईश्वराने ध्यानयोग या साधनामार्गाची निर्मिती करणे

जिवात ईश्वरापासून विलगता वाढल्यामुळे, म्हणजेच ज्ञानशक्तीचा र्‍हास झाल्यामुळे किंवा जिवात असलेली ज्ञानशक्ती ईश्वरप्राप्ती करण्याएवढी नसल्यामुळे ईश्वराने ध्यानयोग या योगमार्गाची, म्हणजेच जिवात दडलेल्या क्रियाशक्तीच्या आधारे ज्ञानशक्तीला जागृत करून त्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या योगमार्गाची उत्पत्ती केली. – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.८.२००६, दुपारी ३.१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’

 

२. क्रियाशक्तीच्या माध्यमातून म्हणजे अंतस्थातून कळणार्‍या सत्याच्या
आधारे ज्ञानशक्तीचे म्हणजे ईश्वराचे स्वरूप जाणणे म्हणजे ध्यानयोग

ध्यानयोग हा क्रियाशक्तीच्या माध्यमातून ज्ञानशक्तीचे, म्हणजेच ईश्वराचे सत्य स्वरूप प्रगट करतो. जिवाद्वारे क्रियाशक्तीच्या सगुणत्वाच्या, म्हणजेच स्थूल क्रियेद्वारे क्रियाशक्तीतील निर्गुणता जागृत करून स्वतःच्या सूक्ष्म अशा घटकांवर नियंत्रण ठेवून ईश्वराच्या ज्ञानमय स्वरूपाला, म्हणजेच अंतस्थातून कळणार्‍या सत्याच्या आधारे ज्ञात करू शकतो.

संदर्भ : साधना (सर्वसाधारण विवेचन)

 

३. त्रेतायुगातील जिवात असलेल्या क्रियाशक्तीच्या प्रबलतेमुळे ध्यानयोगाची उत्पत्ती करणे

त्रेतायुगातील जिवात क्रियाशक्तीची प्रबलता होती; म्हणून ईश्वराने ध्यानयोगाची उत्पत्ती करून लवकरात लवकर जीव ईश्वराशी एकरूप व्हावा, या प्रकारच्या योगमार्गाची उत्पत्ती केली. (कृती करणे, हे सगुणाशी संबंधित आहे. त्यामध्येही ईश्वरी तत्त्व भारलेले असते. त्यात एकाग्रता साध्य झाल्यास निर्गृण साध्य होतो आणि ईश्वराचा बोध होतो.)

 

४. ध्यानयोग : सत् विचाराचे आलंबन, म्हणजे अध्यात्म

ध्यानयोगातील सत् विचाराचे आलंबन, म्हणजेच ‘अध्यात्म’ आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’

 

ध्यान-धारणेमुळे मेंदूचा विकास होतो, हे संशोधनाने सिद्ध !

भारतीय ऋषी-मुनींनी जे लक्षावधी वर्षांपूर्वी सांगितले आहे, ते आता सांगणारे विज्ञान !

न्यूयॉर्क – ध्यान-धारणेमुळे मनाचा व्यायाम होऊन मेंदूची वाढ होते, असे संशोधनाने सिद्ध केले आहे. श्‍वसन नियंत्रित करून एकाग्रता साधण्याच्या ध्यान-धारणेच्या साध्या प्रकारांनी केवळ ८ आठवड्यांच्या आत शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती वाढते. या प्रकारांनी झालेल्या मेंदूच्या रचनेतील एम्.आर्.आय. तपासणीत वरील बाब अमेरिकेच्या संशोधकांना आढळून आली. (भारतीय ऋषी-मुनींनी आणि हिंदूंच्या धर्मग्रंथांत उल्लेख असलेल्या घटना अन् त्यामागील कारणांचा विज्ञानाला ठाव घेता आला नसल्याने बुद्धीवादी हिंदूंच्या धर्मावर टीका करत असतात. तथाकथित पुरोगामी हिंदूही त्यात आघाडीवर असतात; मात्र जेव्हा विज्ञानातून हिंदु धर्मातील घटनांविषयी माहिती सिद्ध होते, तेव्हा त्याचे महत्त्व पटते. आतातरी हिंदु धर्मावर टीका करणारे तथाकथित बुद्धीवादी आणि पुरोगामी गप्प बसतील आणि पाश्‍चात्त्यांप्रमाणे जिज्ञासेने संशोधन करतील अशी अपेक्षा ! – संपादक)

हार्वर्ड संस्थेतील मज्जातंतू विशेषज्ञ डॉ. सारा लाझार म्हणाल्या, तुम्ही जेव्हा मेंदूचा एखादा भाग वापरता, तेव्हा तो वाढलेला आढळेल. ध्यान हे मूलतः मनाचा व्यायाम आहे. शरीराप्रमाणे मन वापरले नाही, तर ते निकामी होते, हा नियमच आहे. ध्यान करतांना शरीरात होणार्‍या पालटांवर मन एकाग्र करावे आणि इतर विचार काढून टाकावेत. आम्ही १६ स्वयंसेवकांना वरील व्यायाम प्रत्येक दिवशी अर्धा घंटा करायला सांगितला. नंतर त्यांचे आणि व्यायाम न करणार्‍यांचे एम्.आर्.आय. तुलनात्मक तपासून बघितले. त्यातून वरील निष्कर्ष निघाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment