तुंग (जिल्हा सांगली) येथील मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मान !

लहान मुलांशी आदर्श संवाद साधण्याविषयी केले लिखाण

सन्मानपत्र स्वीकारतांना सौ. पौर्णिमा गडकरी

तुंग (जिल्हा सांगली) – सकाळ माध्यम समुहाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या ‘सकाळ एन्.आय.ई.’ (‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’) आणि ‘एम्.टेक. इंजिनीयर्स, पुणे’ यांच्या वतीने आयोजित ‘असा साधला संवाद’ या राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते. याविषयी अंकुर बालमंदिर, तुंग शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा उमेश गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. सकाळ माध्यम समुहाच्या संचालिका मृणाल पवार, ‘एम्.टेक. इंजिनीअर्स’चे संचालक मंदार किराणे आणि संचालक मनीष कोल्हटकर यांच्या वतीने सौ. गडकरी यांना सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Leave a Comment