सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील समविचारी हिंदूंनी एकत्र येऊन साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे घातले.

या प्रसंगी उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, सौ. मनीषा बीडकर, उद्योजक श्री. आनंद पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, श्री. कैलास जाधव, ‘मराठा तितुका मेळवावा’चे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर, ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हरि विष्णु कुंभार, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, सौ. मेघा जोशी, सौ. सुरेखा काकडे यांसह अन्य उपस्थित होते.


या अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, निगवे, भुयेवाडी, हुपरी यांसह अन्य गावांमध्येही ५० हून अधिक देवालयांमध्ये साकडे घालण्यात आले. जन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध भागांतील मंदिराची स्वच्छताही करण्यात येत आहे. आतापर्यंत ३३ हून अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील ३३ हून अधिक मंदिरांमध्ये साकडे !
सांगली – सांगली जिल्ह्यात ३३ हून अधिक मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले.


यात प्रामुख्याने मिरज येथील संत वेणास्वामी मठ, काशी विश्वेश्वर देवालय, अंबाबाई मंदिर, सांगलीतील गावभागातील श्री मारुति मंदिर, हरिपूर येथील बागेतील गणपति, तुंग येथील श्री मारुति मंदिर, ईश्वरपूर येथील श्री यमाई मंदिर, भवानीमाता मंदिर, विटा येथील भैरवनाथ मंदिर, पलूस येथील पद्मावती मंदिर यांसह अन्य मंदिरांचा समावेश आहे. जन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध भागांतील मंदिरांची स्वच्छताही करण्यात येत आहे, तसेच ‘समाजाने साधना करावी आणि देवतांचे आशीर्वाद मिळावे’, यांसाठी ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात येत आहेत.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...