सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या डॉ. रणजित काशिद यांना संशोधनातील पुरस्कार घोषित !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे विविध पुरस्कार घोषित

डॉ. रणजित काशिद

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे विविध पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे हे युवा पुरस्काराचे मानकरी ठरले असून १० फेब्रुवारीला विद्यापिठाच्या वर्धापनदिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतील. विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे यांनी पुरस्कारांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. या वर्षीचा कला क्षेत्रातील युवा पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना घोषित झाला आहे, तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्रियेशा देशमुख, समाजकार्यातील पुरस्कार डॉ. अमोल वाघमारे यांना देण्यात येणार आहे. संशोधनातील पुरस्कार डॉ. रणजित काशिद यांना देण्यात येणार आहे. ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात.

उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला, उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. माधुरी जावळे, डॉ. चारुशीला पाटील यांना देण्यात येणार आहे.

Leave a Comment