
रत्नागिरी – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा आणि ‘गुरु हेच अवघे विश्व’ असणार्या येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांनी २९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पू. खेरआजी वर्ष १९९८ पासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. त्यांनी १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी संतपद प्राप्त केले. त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या उत्तम संस्कारांमुळे त्यांचा परिवारही सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनारत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा श्री. मिलिंद खेर, सून सौ. मीनल खेर, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या परिवारातील अनेक जणांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठला आहे.
‘प.पू. डॉक्टर सर्व काही करत आहेत. त्यामुळे आपल्याला कसलीच काळजी नाही. स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न केला, तरच आपली प्रगती होणार आहे. नामस्मरण करत सेवा केल्यास आनंद मिळतो. नामस्मरणाने पुष्कळ लाभ होतो. मन निर्विचार रहाते. मनातील विकल्प निघून जातात’, असे त्या साधकांना मार्गदर्शन करत असत.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...