
पनवेल – प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीत श्री दत्तात्रेयांची प्रतिमा, त्यांची मूर्ती आणि प.पू. शिवगिरी महाराजांच्या पादुका आसनस्थ होत्या. पालखीच्या अग्रस्थानी धर्मदंड हातात घेतलेले भक्त होते. आश्रमात पालखीचे आगमन झाल्यावर धर्मदंड घेतलेल्या भक्तांच्या पायावर जल अर्पण करण्यात आले आणि धर्मदंडाला कुंकू लावून त्याचे पूजन करण्यात आले. पालखीतील श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेला सनातनचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. अविनाश गिरकर यांनी ओवाळले अन् पुष्पहार अर्पण केला. धर्मध्वजाचे पूजन ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. यशवंत वसाने यांनी केले. शिवगिरी संप्रदायाचे अनेक भक्त पालखीत सहभागी झाले होते.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...