विविध प्रकारच्या धुतलेल्या अन् न धुतलेल्या नवीन आणि वापरलेल्या वस्त्रांची तुलना

अनुक्रमणिका

१. न धुतलेले (मलीन) आणि धुतलेले कपडे (धूतवस्त्र) वापरल्यामुळे होणारे परिणाम अन् त्या संदर्भातील सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे

१ अ. न धुतलेले कपडे घातल्याने होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र

१ आ. धुतलेले कपडे घातल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

२. धुतलेले अन् न धुतलेले नवीन सुती वस्त्र, तसेच वापरून धुतलेले आणि वापरून न धुतलेले; पण वापरलेले सुती वस्त्र

३. धुतलेले अन् न धुतलेले नवीन कौशेय वस्त्र, तसेच वापरून धुतलेले आणि वापरून न धुतलेले; पण वापरलेले कौशेय वस्त्र

४. धुतलेली आणि न धुतलेली वल्कले

५. कृत्रिम धाग्यांपासून (नायलॉन, टेरिलिन, रेयॉन आणि पॉलिस्टर यांपासून) बनवलेले कपडे

५ अ. कृत्रिम धाग्यांत असलेल्या रासायनिक घटकांमुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ अल्प प्रमाणात होणे

५ आ. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेली वस्त्रे रज-तमाला आकर्षून घेणारी असल्याने त्यांवर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची तीव्रता सर्वांत जास्त असणे

६. नायलॉन, रेयॉन, लोकर, सुती आणि रेशमी वस्त्र


धुतलेले कपडे घातल्यामुळे देवतांची स्पंदने कपडे आणि व्यक्ती यांच्याकडे आकृष्ट होतात. ही आकृष्ट झालेली देवतांची स्पंदने कपड्यांच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होतात. ही प्रक्रिया कशी होते, त्याविषयी पाहू.

१. न धुतलेले (मलीन) आणि धुतलेले कपडे (धूतवस्त्र)
वापरल्यामुळे होणारे परिणाम अन् त्या संदर्भातील सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे

‘मलीनतेत मोठ्या प्रमाणात रज-तमात्मक लहरी घनीभूत स्तरावर एकत्रित झालेल्या असतात. मलीन वस्त्रातील रज-तमात्मक लहरींच्या स्पर्शाने स्थूलदेहाला, तसेच मनोदेहाला दूषितता प्राप्त होऊन देह अनेक दुष्ट व्याधींनी आणि मन अनेक असात्त्विक विचारांनी ग्रासण्याची शक्यता असते; म्हणून मलीन कपडे घालणे टाळावे. धूतवस्त्राच्या स्पर्शाने सत्त्वगुणाचे देहात संवर्धन होण्यास साहाय्य होते आणि जीव संस्कारजन्य बनून आध्यात्मिक ध्येयाकडे वाटचाल करतो; म्हणून नेहमी धूतवस्त्र परिधान करावे.’ – सूक्ष्म-जगतातील एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५११० (३.३.२००८, सकाळी १०.४०)

१ अ. न धुतलेले कपडे घातल्याने होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र

१. चित्रातील त्रासदायक स्पंदने : ’३ टक्के ’ – प.पू. डॉ. आठवले

२. ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : त्रासदायक शक्ती ३ टक्के आणि काळी शक्ती ३.२५ टक्के

३. इतर सूत्रे
अ. व्यक्ती ज्या वेळी कपडे परिधान करते, त्या वेळी तिच्या देहातून उत्सर्जित होणारा वायू कपड्यांमध्ये साठून रहातो, तसेच देहातून उत्सर्जित होणारा घाम कपड्यांतील कणाकणांत सामावून रहातो.

अ १. शरिरातून उत्सर्जित होणार्‍या वायूमुळे कालांतराने कपड्यांना दुर्गंध येतो.

अ २. देहातून प्रक्षेपित होणार्‍या दुर्गंधामुळे वातावरणातील काळी शक्ती कपड्याकडे आकृष्ट होते.

आ. न धुतलेले कपडे वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम

आ १. त्या कपड्यांकडे आकृष्ट झालेल्या काळ्या शक्तीला देहावर आक्रमण करणे सोपे जाते.

आ २. देह, मन आणि बुद्धी यांवर काळ्या शक्तीचे आवरण येऊन निरूत्साह येतो.

आ ३. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तीनही स्तरांवर त्रास होतात. यामध्ये मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे प्रमाण अधिक असते.

आ ४. देहातील सप्तचक्रांवरही परिणाम होऊन त्यांवर काळ्या शक्तीचे आवरण येते.

आ ५. त्या कपड्यांतून प्रक्षेपित होणारी त्रासदायक स्पंदने पहाणार्‍या व्यक्तीकडेही प्रक्षेपित होतात.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (वैशाख कृ. ६, कलियुग वर्ष ५११३ (२३.५.२०११)

१ आ. धुतलेले कपडे घातल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

१. चित्रातील चांगली स्पंदने : २ टक्के’ – प.पू. डॉ. आठवले

२. ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : ईश्वरी तत्त्व ०.२५ टक्का, आनंद १.०५ टक्का, सगुण चैतन्य १.२५ टक्का आणि कार्यशक्ती (शक्ती) २ टक्के

३. इतर सूत्रे
अ. मानवाचे रक्षण होणे

अ १. कपडे मानवाचे उन, पाऊस, थंडी आदींपासून रक्षण करतात, तसेच कपड्यांमुळे मानवाचे वाईट शक्तींपासूनही रक्षण होते.

अ २. मानवाच्या देहावर असणार्‍या कपड्यांच्या आवरणामुळे अल्प शक्तींच्या वाईट शक्तींना मानवाच्या देहावर प्रत्यक्ष आक्रमण करता येत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर आक्रमण करण्यापूर्वी वाईट शक्तींना प्रथम त्यांच्या कपड्यांवर आक्रमण करावे लागते.

आ. कपड्यांमध्ये देवतांची स्पंदने सामावून रहाणे : धुतलेले कपडे घातल्यामुळे देवतांची स्पंदने कपडे आणि व्यक्ती यांच्याकडे आकृष्ट होतात. तसेच ही आकृष्ट झालेली देवतांची स्पंदने कपड्यांच्या धाग्यांमध्ये सामावून रहातात आणि पुढे व्यक्तीला प्राप्त होतात.

इ. कपडे धुण्याच्या प्रक्रियेमुळे आप, वायू आणि तेज तत्त्वे व्यक्तीला प्राप्त होणे : कपडे धुण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याच्या माध्यमातून कपड्यांचा आपतत्त्वाशी संपर्क येतो आणि आपतत्त्वामुळे कपड्यांतील काळी शक्ती नष्ट होते. तसेच कपडे वाळवण्याच्या प्रक्रियेमध्ये कपड्यांचा वायूतत्त्वाशी संपर्क येतो आणि कपडे उन्हात वाळवल्यास तेजतत्त्व कपड्यांमध्ये आकृष्ट होते. अशा प्रकारे कपड्यांमध्ये आकृष्ट झालेली तत्त्वे कपड्यांच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होतात.

ई. देह, मन आणि बुद्धी यांवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होणे : धुतलेले कपडे घातल्यामुळे व्यक्तीच्या देह, मन आणि बुद्धी यांवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होऊन तिला कार्य करण्यासाठी उत्तेजन मिळते.

उ. धुतलेले कपडे घातल्यामुळे होणारे लाभ : शारीरिक १.२५ टक्के, मानसिक २ टक्के आणि आध्यात्मिक २ टक्के’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (पौष कृ. ३, कलियुग वर्ष ५११२ (२२.१.२०११)

२. धुतलेले अन् न धुतलेले नवीन सुती वस्त्र, तसेच
वापरून धुतलेले आणि वापरून न धुतलेले; पण वापरलेले सुती वस्त्र

नवीन सुती वस्त्र

वापरलेले सुती वस्त्र

धुतलेले

न धुतलेले

धुतलेले

न धुतलेले

१. ‘सगुणाचे वैशिष्ट्य कनिष्ठ मध्यम प्रवाही सगुण कनिष्ठ जडत्वदर्शक सगुण कनिष्ठ प्रवाही सगुण कनिष्ठ जडत्वदर्शक सगुण
२. वाईट शक्तींचे आक्रमण

अ. प्रमाण (टक्के)

आ. कारण

१०

धुतल्याने वस्त्राची सात्त्विक लहरी ग्रहण करून त्यांना प्रवाही करण्याची क्षमता वाढल्याने सर्वांत अल्प प्रमाणात वाईट शक्तींचे आक्रमण होणे

१५

न धुतल्याने जडत्वप्रधान लहरी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाचे प्रमाण थोडे जास्त असणे

२०

धुतल्यानंतर मलीनता अल्प झाल्याने न धुतलेल्या वस्त्राच्या तुलनेत आक्रमण अल्प होणे

३०

रज-तमाचे कण कपड्यात असल्याने आक्रमणाचे प्रमाण धुतलेल्या वस्त्राच्या तुलनेत जास्त असणे

३. चैतन्य प्रक्षेपणाची क्षमता (टक्के) १५ १०
४. जिवावर होणारा परिणाम प्रवाही सगुणाच्या स्पर्शामुळे ढकलल्यासारखे होणे हाता-पायाला मुंग्या येणे प्रवाही लहरींच्या स्पर्शामुळे थोडीशी अस्वस्थता वाढणे जडत्वदर्शक सगुणामुळे शरिराला बधीरता येणे
५. वस्त्राकडे पाहून इतरांना जाणवणारा परिणाम मन उत्साही होणे कार्य करावेसे वाटणे पाहिल्यावर डोळे चुरचुरणे पाहू नये, असे वाटणे

३. धुतलेले अन् न धुतलेले नवीन कौशेय वस्त्र, तसेच
वापरून धुतलेले आणि वापरून न धुतलेले; पण वापरलेले कौशेय वस्त्र

नवीन कौशेय (रेशमी) वस्त्र

वापरलेले कौशेय (रेशमी) वस्त्र

धुतलेले

न धुतलेले

धुतलेले

न धुतलेले

१. ‘सगुणाचे वैशिष्ट्य उच्च प्रवाही सगुण उच्च जडत्वदर्शक सगुण मध्यम प्रवाही सगुण मध्यम जडत्वदर्शक सगुण
२. वाईट शक्तींचे आक्रमण

अ. प्रमाण (टक्के)

आ. कारण

१० १५ २०
३. चैतन्य प्रक्षेपणाची क्षमता (टक्के) २० १५ १०
४. जिवावर होणारा परिणाम प्रवाही लहरींतील तेजामुळे उष्ण लहरी शरिरात फिरतांना जाणवणे देहातील चक्रावर उष्ण ऊर्जेचा दाब जाणवणे प्रवाही लहरींतील तेजामुळे घाम येणे जडत्वदर्शक तेजामुळे शरिरात उष्णता जाणवणे
५. वस्त्राकडे पाहून इतरांना जाणवणारा परिणाम निर्मळ वाटणे मन प्रसन्न होणे चांगले वाटणे चांगले वाटण्याचे प्रमाण वापरलेल्या धुतलेल्या कौशेय वस्त्राच्या तुलनेत अल्प असणे

टीप १ – धुतलेले नवीन वस्त्र व्यक्तीगत स्पंदने आणि मलीनता यांनी भारित नसल्याने त्याचे सत्त्वगुण आकृष्ट करण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वापरलेल्या कौशेय (रेशमी) वस्त्रापेक्षा धुतलेल्या नवीन कौशेय (रेशमी) वस्त्रावर काळे आवरण येण्याचे प्रमाण अल्प असते.

टीप २ – वस्त्र सात्त्विक असले, तरी ते न धुतल्याने त्यावर आलेल्या रज-तमामुळे त्याची सत्त्वलहरी ग्रहण करण्याची क्षमता अल्प होते. त्यामुळे त्या वस्त्रावर होणार्‍या आक्रमणांचे प्रमाण धुतलेल्या नवीन कौशेय वस्त्राच्या तुलनेत जास्त असते.

टीप ३ – कौशेय वस्त्राकडे आकर्षिल्या जाणार्‍या सत्त्वलहरींचे प्रमाण जास्त असल्याने आक्रमणाचे प्रमाण सुती वस्त्रापेक्षा अल्प असते.

टीप ४ – न धुतलेल्या वस्त्रात मलीनतेचे प्रमाण जास्त असल्याने त्याकडे आकर्षिल्या जाणार्‍या सत्त्वलहरींच्या प्रवाहाला अडथळा प्राप्त होऊन त्यावर येणार्‍या काळ्या आवरणाचे प्रमाण वाढते.

४. धुतलेली आणि न धुतलेली वल्कले

वल्कले

धुतलेले

न धुतलेले

१. ‘सगुणाचे वैशिष्ट्य उच्च तेजरूपी प्रवाही सगुण उच्च तेजरूपी जडत्वदर्शक सगुण
२. वाईट शक्तींचे आक्रमण

अ. प्रमाण (टक्के)

आ. कारण

झाडाच्या अर्तसालापासून बनवलेली असल्याने यात अग्नीरूपी तेजाचे संवर्धन करण्याची क्षमता मूलतःच जास्त असल्याने आणि आपतत्त्वाच्या प्रभावाने यातील तेजरूपी लहरी जिवाला ग्रहणयोग्य बनल्याने आक्रमणांचे प्रमाण अल्प असणे

यातील तेजतत्त्व जास्त प्रमाणात अकार्यरत असल्याने ते कार्यरत करून याचा लाभ मिळवणे ६० टक्क्यांच्या पुढील पातळीला शक्य असते. जडत्वदर्शक अकार्यरत तेजाच्या घनीकरणामुळे आणि त्यावर आलेल्या मालिन्यामुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण पहिल्याच्या तुलनेत जास्त असणे

३. चैतन्य प्रक्षेपणाची क्षमता (टक्के) ३० २५
४. जिवावर होणारा परिणाम प्रवाही तेजरूपी लहरींमुळे देहातील अंतःस्थ पोकळ्यांतील उष्णता वाढल्याने आतून उष्णपणा जाणवणे; परंतु बाहेरून थंड असणे देहाला जडत्वदर्शक तेजरूपी लहरींचा स्पर्श झाल्याने भारावल्यासारखे होऊन शरीर जड होणे
५. वस्त्राकडे पाहून इतरांना जाणवणारा परिणाम पवित्र वाटणे मनात त्यागरूपी भावना निर्माण होणे

आपले पूर्वीचे ऋषीमुनी वल्कले नेसत. त्या संदर्भात पाश्चात्त्य टीकाकार अज्ञानाने लिहितात, ‘ऋषीमुनी रानटी अवस्थेतील होते; त्यामुळे ते वल्कले नेसत.’ वल्कलांमध्ये असणारी वाईट शक्तींचा अवरोध आणि चैतन्य प्रक्षेपण करण्याची क्षमता पाहिल्यावर ऋषीमुनींची ही कृती अध्यात्मदृष्ट्या किती परिपूर्ण होती, हे कळते. यावरून ऋषीमुनींची योग्यता आणि हिंदु संस्कृतीची महानता, दोन्ही लक्षात येते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १८.९.२००६, दुपारी ३.५०)

५. कृत्रिम धाग्यांपासून (नायलॉन, टेरिलिन, रेयॉन आणि पॉलिस्टर यांपासून) बनवलेले कपडे

५ अ. कृत्रिम धाग्यांत असलेल्या रासायनिक घटकांमुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ अल्प प्रमाणात होणे

‘टेरिलिन, पॉलिस्टर, नायलॉन यांसारख्या कापडांमध्ये रासायनिक घटक असल्याने त्यांत ईश्वरी चैतन्य ग्रहण होण्याचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ अल्प प्रमाणात होतो.’ – एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून, फाल्गुन कृष्ण द्वितीया, कलियुग वर्ष ५११० (२५.३.२००८, पहाटे ३.५०)

५ आ. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेली वस्त्रे रज-तमाला आकर्षून घेणारी
असल्याने त्यांवर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची तीव्रता सर्वांत जास्त असणे

‘कृत्रिम धाग्यांतील जडत्वाकर्षण शक्तीच्या (रज-तमाला आकर्षून घेणार्‍या शक्तीच्या) प्रभावामुळे पॉलिस्टर, नायलॉन, रेयॉन यांसारख्या धाग्यांनी बनवलेले वस्त्र वापरू नये. या धाग्यांनी युक्त वस्त्रांवर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची तीव्रता सर्वांत जास्त असते; म्हणून ही वस्त्रे पूजाविधीत निषिद्ध मानली जातात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १७.९.२००६, रात्री १०.४७)

६. नायलॉन, रेयॉन, लोकर, सुती आणि रेशमी वस्त्र

रेयॉन

लोकर

सुती

कौशेय (रेशमी)

नायलॉन

१. ‘तत्त्व कनिष्ठ सगुण मध्यम सगुण सगुण सगुण-निर्गुण निर्गुण-सगुण
२. गुण तम-रज रज-तम रज सत्त्व-रज सत्त्व
३. कार्यातील पंचतत्त्व पृथ्वी पृथ्वी-आप अल्प पृथ्वी-आप अंशतः पृथ्वी-आप तेज-आप
४. ग्रहण आणि/ किंवा प्रक्षेपण करण्याचा स्तर तमोगुण आकृष्ट करणे तमोगुण प्रक्षेपित करण्याचा वेग जास्त असणे रजोगुणाचे ग्रहण आणि प्रक्षेपण सत्त्वगुणाचा संचय सत्त्वगुणाचा संचय आणि प्रक्षेपण
५. जिवावर होणारा परिणाम चिडचीड होणे देहाला जडत्व येणे कार्य वेगात होणे चांगल्या विचारांसहित कार्य घडणे कृती करतांना भाव जागृत झाल्याने अकर्म कर्म होणे
६. शुद्धी / अशुद्धी देह आणि देहमंडल अशुद्ध होणे प्राधान्याने देह अशुद्ध होणे स्थूलदेहाची शुद्धी स्थूलदेह आणि मनोदेह यांची शुद्धी स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांची शुद्धी’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment