राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

१. राखीपौर्णिमा आणि तिचे महत्त्व

‘श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! ११.८.२०२२ या दिवशी ‘राखीपौर्णिमा’ आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते. यामागे ‘भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने आपले रक्षण करावे’, ही भूमिका असते. या दिवशी भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.

२. सध्याच्या काळानुसार श्रेष्ठ ओवाळणी !

राखीपौर्णिमेच्या दिनी आपल्या बहिणीला कपडे, दागिने आदी अशाश्वत भेटवस्तू देण्याऐवजी चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणार्‍या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक याेग्य ठरेल.

३. सहजसोप्या भाषेत धर्मशास्त्र सांगून धर्माप्रती श्रद्धा वाढवणारे सनातनचे ग्रंथ !

सनातनने जुलै २०२२ पर्यंत अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी विषयांवरील ३५७ ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ८९ लाख ९७ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत. हे ग्रंथ १७ भाषांत उपलब्ध असून ते वाचकांना ‘काळानुसार आवश्यक साधना कोणती ? देवतांची उपासना कशी करावी ? धार्मिक उत्सव कसे साजरे करावेत ?’ आदी विषयांवरील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देतात. त्यामुळे त्यांची धर्माप्रती श्रद्धा वाढते.

बहिणीला देण्यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास पुढील लिंक वर क्लिक करा  https://sanatanshop.com/

 

Leave a Comment