नवी देहली – मोक्षदायी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै २०२२ या दिवशी नवी देहली येथील मालवीयनगरमधील श्री गीता भवन मंदिर, उत्तरप्रदेशमधील नोएडाच्या सेक्टर १२ मधील ईशान म्युझिक सेंटर, मथुरामधील श्रीजी गार्डन सोसायटीमध्ये आणि फरिदाबादच्या सेक्टर २८ मधील रघुनाथ मंदिर येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाचा मोठ्या संख्येने जिज्ञासूंनी लाभ घेतला.
१. केवळ हिंदु राष्ट्रातच उत्तम शिक्षणपद्धतीचे
पालन होऊ शकते ! – जगदीशचंद्र चौधरी, मुख्य
संस्थापक तथा संचालक, बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, हरियाणा

फरिदाबाद – आज सर्वांगीण शिक्षणाची चर्चा केली जाते; परंतु हे शिक्षण भौतिकतेच्या दिशेने घेऊन जात आहे. ज्यात पूर्णत्व आणि स्वातंत्र्य यांचा अभाव आहे. भारतीय शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते. त्यामुळे केवळ हिंदु राष्ट्रातच उत्तम शिक्षणपद्धतीचे पालन होऊ शकते, असे प्रतिपादन ‘बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन’चे मुख्य संस्थापक आणि संचालक श्री. जगदीशचंद्र चौधरी यांनी केले.
फरिदाबाद येथे समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे, नोएडा येथील गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री, तर मथुरा येथे सनातन संस्थेच्या कु. अक्षिता वार्ष्णेय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्षणचित्र
मथुरा येथील गुरुपौर्णिमेचे मार्गदर्शन ऐकल्यावर काही जिज्ञासूंची भावजागृती होऊन भावाश्रू आले.





साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...