परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन करतांना सौ. लक्ष्मी नायक
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री. पाला संतोष
मदुराई – १० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले. सनातन संस्थेच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘धर्माचरण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’, यांविषयीचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कलेवणी बल्लीनायगम यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सौ. सुगंधी जयकुमार
| ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ (हिंदु युवा जागरूकता महासंघ)चे तंजावूर येथील नेते श्री. पाला संतोष यांनी मुख्य अतिथी म्हणून भाषण केले. ते म्हणाले, ‘‘मदुराई ही पुण्यभूमी आहे. मदुराई मीनाक्षी अम्मादेवीमुळे पावन झालेली ही भूमी हिंदु संस्कृतीचे केंद्र आहे. गावागावांमधून हिंदु संस्कृतीविषयी जागृती होणे आवश्यक आहे.’’ |
क्षणचित्रे
१. सभागृहाचे मालक श्री. सुब्बुराम यांनी कार्यक्रमासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. तसेच त्यांनी भोजनही अर्पण केले.
२. सभागृहाचे व्यवस्थापक राजशेखर यांनी सनातनचे सत्संग तरुणांपर्यंत पोचवण्याची तीव्र इच्छा असल्याचे सांगितले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !