फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

फरिदाबाद (हरियाणा) – येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे श्री. अरविंद गुप्ता यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व, मकरसंक्रांती साजरा करण्यामागील अध्यात्मशास्त्र, मकरसंक्रांतीनिमित्त दान करण्याचे महत्त्व आदी विषयांवर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनिता राणा हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment