धनत्यागाच्या माध्यमातून स्वतःला धर्मकार्यात झोकून देणारे आणि साधकांप्रती प्रेमभाव असलेले देहली येथील साधक दांपत्य श्री. संजीव कुमार (वय ७० वर्षे) अन् सौ. माला कुमार (वय ६७ वर्षे) सनातनच्या ११५ व्या आणि ११६ व्या समष्टी संतपदी विराजमान !

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार

देहली – त्यागी वृत्ती आणि सतत कृतज्ञताभावात रहाणारे देहली येथील श्री. संजीव कुमार(वय ७० वर्षे) सनातनच्या ११५ व्या समष्टी संतपदी अन् सेवाभावी वृत्ती आणि सतत आनंदावस्थेत रहाणार्‍या त्यांच्या पत्नी सौ. माला कुमार सनातनच्या ११६ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याची घोषणा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी २३ डिसेंबर २०२१ या दिवशी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सत्संगात केली.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी पू. संजीव कुमार यांचा, तर ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. मंजुला हरिश कपूर यांनी पू. (सौ.) माला कुमार यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी या संतदांपत्याला भेटवस्तू दिली. या मंगलप्रसंगी पू. (सौ.) माला आणि पू. संजीव कुमार यांची ज्येष्ठ कन्या अनन्या कुमार उपस्थित होत्या, तर कनिष्ठ कन्या सौ. आनंदिता दासगुप्ता या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या. या सोहळ्याला कुमार दांपत्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेले सनातनचे झारखंड येथील संत पू. प्रदीप खेमका आणि त्यांची पत्नी पू. (सौ.) सुनिता खेमका हे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सोहळ्याला उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment