रामनाथी (गोवा) – संतपती पू. नीलकंठ दीक्षित यांची शिष्यभावाने सेवा करणार्या, व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्या.

कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.११.२०२१) या दिवशी असलेल्या त्यांच्या ८९ व्या वाढदिवसाच्या दिनी सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंददायी घोषणा केली. ही वार्ता ऐकून श्रीमती विजया दीक्षित यांचा भाव दाटून आला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. आजी यांना पुष्पहार घालून, तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षणही केले.

नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय...
उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा...
सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.)...
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्या सनातनच्या १३० व्या संत उजिरे,...
सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत...