धर्मांध घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदू ‘मानव’ म्हणून शेष रहाणार नाहीत ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

धर्मांध घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. असे असतांनाही वर्ष २०१२ मध्ये ४० सहस्र असणारी रोहिंग्यांची संख्या आता कोट्यवधींच्या घरात आहे. सुरक्षायंत्रणांच्या माहितीनुसार भारतात ६ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत. नव्या माहितीनुसार देहलीत ११ सहस्र अफगाणिस्तानचे घुसखोर आले आहेत. देहलीत रोहिंग्यांच्या झोपड्या अचानक जळल्यावर तेथे आम आदमी पक्षाच्या नेत्याने भेट दिली. तसेच देहली सरकारने प्रत्येक रोहिंग्याला अर्थसाहाय्य देण्यासह नवीन घर, वीज, पाणी आदी देण्याचे घोषित केले आहे. हा प्रकार म्हणजे बहुसंख्य हिंदूंनी कर भरायचा आणि घुसखोरांना सुविधा द्यायच्या, असे असून हिंदू हे कदापि सहन करणार नाहीत. घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदू ‘मानव’ म्हणून शेष रहाणार नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment