सनातनचे सर्व ग्रंथ उत्तम असून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ठेवणे आवश्यक ! – महर्षि डॉ. आनंद गुरुजी, अध्यक्ष, कर्नाटक राज्य धार्मिक परिषद

महर्षि डॉ. आनंद गुरुजी

बेंगळुरू (कर्नाटक) – प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबियांना, कुटुंबातील व्यक्तींना आणि मुलांना धर्मशिक्षण द्यावे. आधुनिक जीवनात सर्व लोक मायेत गुरफटल्याने त्यांना ज्ञान देण्यासाठी सनातनने अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. हे ग्रंथ सर्वांच्या घरी असायला हवे. सनातनने या ग्रंथांतून हिंदु धर्मातील बारकाव्यांची चांगली माहिती दिली आहे. सनातनचे सर्व ग्रंथ उत्तम असून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ते ठेवणे आवश्यक आहे, असे गौरवोद्गार कर्नाटक राज्य धार्मिक परिषदेचे अध्यक्ष महर्षि डॉ. आनंद गुरुजी यांनी काढले. १३ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या साधकांनी ‘सनातन ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’साठी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.

कर्नाटक राज्यात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘सनातन ज्ञानशक्ती प्रसार मोहीम’ या नावाने एक अभियान चालू असून या माध्यमातून सनातनच्या चैतन्यमयी ग्रंथांचा व्यापक प्रसार करण्यात येत आहे. सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानशक्ती घरोघरी पोचवण्याचा या मोहिमेचा व्यापक उद्देश असून यात सनातनचे साधक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक सहभागी झाले आहेत.

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संदर्भ : दैनिक सनातन प्रधान

Leave a Comment