मे २०२० पर्यंत सनातनच्या ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती !

‘सनातन संस्था’निर्मित आणि प.पू. डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, आचारधर्म, संतचरित्र, साधना, देवता, बालसंस्कार, वाईट शक्तींचे त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय, अनुभूती, स्वभावदोष निर्मूलन, राष्ट्ररक्षण, धर्मरक्षण इत्यादी विषयांवरील ग्रंथांची संख्या मे २०२० पर्यंत ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती झाली आहे.

‘सनातन ग्रंथां’च्या प्रकाशनाची ही गरुडझेप म्हणजे ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रसाराचे कार्य वृद्धींगत होत असल्याची पोचपावती होय ! इतकेच नाही, तर सनातनवर बंदी आणू इच्छिणारे राज्यकर्ते आणि सनातनविषयी सातत्याने अपप्रचार करणारे सनातनद्वेष्टे (धर्मद्वेष्टे) यांना ही सणसणीत चपराक आहे. ‘जसा विरोध होतो, तसे कार्य वाढते’, हे तत्त्व सनातनच्या कार्याविषयी तंतोतंत खरे ठरले आहे !

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment