योग्य साधना हेच जीवनातील प्रत्येक समस्यांचे उत्तर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

तासगाव (जिल्हा सांगली) – जीवनात साधना अत्यंत महत्त्वाची असून आयुष्यभर केलेल्या योग्य साधनेमुळे मनुष्य सतत आनंदी राहू शकतो. मुनष्य जीवनात येणार्‍या सुख-दु:खावर मात करण्यासाठी साधनाच उपयोगी पडते, किंबहुना साधना हेच जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर आहे. तरी प्रत्येकाने कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप, अशी योग्य साधना केल्यास त्यांनाही आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. गेल्या काही मासांपासून जे धर्मप्रेमी नियमित साधना करत आहेत, त्यांच्यासाठी ३१ ऑक्टोबर या दिवशी एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.

या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील अनेक जिज्ञासूंची उपस्थिती होती. या वेळी अनेक धर्मप्रेमींनी साधनेमुळे त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे पालट झाले ? नामजपाने आणि योग्य साधनेमुळे झालेले लाभ विशद् केले. अनेक धर्मप्रेमींनी साधना चालू केल्यावर मन शांत झाले, राग अल्प झाला, घरातील वाद-विवाद अल्प झाले यांसह झालेले अन्य पालट सांगितले. या कार्यक्रमात धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment