गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आपत्काळाविषयीचे सनातनचे ग्रंथ भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना सनातनचे साधक श्री. प्रमोद नाणोसकर

पणजी – सनातनचे पर्वरी येथील साधक श्री. प्रमोद नाणोसकर यांनी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या आल्तिनो येथील ‘महालक्ष्मी’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी श्री. नाणोसकर यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सनातनचे नूतन ग्रंथ ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा’ अन् ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा’, असे २ ग्रंथ भेट दिले.

या वेळी श्री. प्रमोद नाणोसकर यांनी मुख्यमंत्र्यांना येणार्‍या भीषण आपत्काळाविषयी माहिती दिली. विविध संतांनी आणि नाडी ज्योतिषाच्या माध्यमातून, तसेच संस्थेनेही यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आगामी काळ पुष्कळ भयावह असून या भीषण काळात टिकून रहाण्यासाठी आणि गोव्यातील सर्वसामांन्याचे रक्षण होण्यासाठी अन्नधान्य, पाणी, वीज, औषधोपचार आदी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘मी ‘स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गोवा’, हा उद्देश ठेवून समाजात कार्य चालू केले आहे. कदाचित् याच कार्यासाठी माझी देवाने मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली असावी.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment