सनातन संस्थेच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमधील ‘सनातन चैतन्यवाणी अ‍ॅप’चे लोकार्पण !

‘सनातन चैतन्यवाणी’च्या माध्यमातून नादाच्या म्हणजे
आकाशतत्त्वाच्या स्तरावर कार्य चालू झाले आहे ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘सनातन चैतन्यवाणी’ ऑडिओ अ‍ॅपचे प्रकाशन करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

रामनाथी (गोवा) – समाजाला शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि भावपूर्ण आवाजात म्हटलेले अन् संतांच्या, साधना करणार्‍या साधकांच्या सात्त्विक वाणीतून उच्चारलेले चैतन्यदायी ऑडिओ सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी सनातन संस्थेने अक्षय्य तृतीयेला ‘सनातन चैतन्यवाणी’ ऑडिओ अ‍ॅप हे सर्वप्रथम मराठी भाषेत उपलब्ध केले होते. समाजातून मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे हे अ‍ॅप आता हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. २५ ऑक्टोबरला दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते या तीन भाषांंतील ऑडिओ अ‍ॅपचे येथील सनातन आश्रमात प्रकाशन करण्यात आले.

या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘सनातन चैतन्यवाणी’ या ऑडिओ अ‍ॅपच्या माध्यमातून नादाच्या म्हणजे आकाशतत्त्वाच्या स्तरावर कार्य चालू झाले आहे. ४ भाषांमध्ये असलेल्या या अ‍ॅपमुळे आता मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार होईल. गुरूंच्या आशीर्वादाने सर्वच स्तरांवरील राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे.’’

‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅप ‘गूगल प्ले स्टोअर’वर सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. अधिकाधिक लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा आणि सात्त्विक स्तोत्र, आरती, श्‍लोक, मंत्र, नामजप आदींचा लाभ करून घ्यावा. मराठी भाषेतील हे अ‍ॅप आतापर्यंत २४ सहस्रांहून अधिक जणांनी डाऊनलोड केले आहे.

मराठीसह हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषांमधील हे ॲप ‘गूगल प्ले स्टोअर’च्या पुढील मार्गिकेवरून डाउनलोड करावे. https://www.sanatan.org/Chaitanyavani

Leave a Comment