गायीच्या शेणापासून बनवलेली चिप भ्रमणभाष संचामुळे होणारे किरणोत्सर्ग रोखणार ! – कामधेनू आयोगाचा दावा

अशा प्रकारचे संशोधन केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे ! तसेच गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम देशातील गोहत्या रोखणे अत्यंत आवश्यक आहे !

कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया

नवी देहली – गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन (किरणोत्सर्गविरोधी) चिप बनवण्यात आल्याचा दावा ‘कामधेनू आयोगा’ने केला आहे. ही चिप भ्रमणभाष संचासाठी वापरता येणार आहे. या चिपचे नाव ‘गौसत्व कवच’ असे आहे. ही चिप गुजरातच्या राजकोटमधील ‘श्रीजी गोशाळे’त बनवण्यात आलेली आहे.

कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी याविषयी सांगितले की, गायीचे शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवील. गायीचे शेण हे ‘रेडिएशन’विरोधी असल्याचे वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेले आहे. गायीच्या शेणापासून बनवलेली किरणोत्सर्गविरोधी चिप किरणोत्सर्ग न्यून करण्यासाठी भ्रमणभाष संचामध्येही वापरता येऊ शकते. आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment