
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक, तसेच हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सोलापूर येथील भागवताचार्य वा.ना. उत्पात (वय ८० वर्षे) यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात २८ सप्टेंबर या दिवशी निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास, तसेच प्रसारही केला होता. त्यांच्या पश्चात मुलगा माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात, सून, ४ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार उत्पात कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
भागवताचार्य वा.ना. उत्पात हे कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते. पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे दायित्व सांभाळले. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते, तर पंढरपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाचीही त्यांनी स्थापना केली होती. त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २५ वर्षे ‘श्रीमद्भागवत्’ आणि ‘रुक्मिणी स्वयंवर’ या कथा सांगितल्या.
भागवताचार्य वा.ना. उत्पात यांची सनातन संस्था
आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयीची आत्मीयता !
१. भागवताचार्य वा.ना. उत्पात हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यक्रमांसाठी सावरकर वाचनालयाचे सभागृह अन् ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून देत होते.
२. पंढरपूर येथे विविध कार्यक्रमांनिमित्त अनेक वेळा लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाचे, तसेच धर्मरथ वितरण कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेले आहे.
३. सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमात आणि हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये त्यांनी वक्ता म्हणून मार्गदर्शन केले होते.
४. काही वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला त्यांनी भेट दिली होती.
५. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर येथे घेण्यात आलेली विविध आंदोलने आणि मोर्चे यांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी त्यांना विशेष प्रेम होते.
६. वर्ष २०१८ मध्ये प्रसारमाध्यमांतून सनातन संस्थेविषयी अपप्रचार चालू असतांना त्यांनी सोलापूर येथे झालेल्या जनसंवाद सभेमध्ये ‘अभ्यास न करता प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी यांनी सनातन संस्थेविषयी अपप्रचार करू नये !’, असे ठणकावून सांगितले होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !