तीन पिढ्यांचा कीर्तन परंपरेचा वारसा असलेल्या पू. चंद्रशेखर (अण्णा) केळकर महाराज यांचा देहत्याग !

सांगली – पंचक्रोशीतील सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान, तीन पिढ्यांचा कीर्तन परंपरेचा वारसा असलेले सांगलीतील पू. चंद्रशेखर (अण्णा) रामराय केळकर महाराज (वय ७६ वर्षे) यांनी २३ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला आहे. सायंकाळी भारती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सेवानिवृत्तीनंतर तीन पिढ्यांची कीर्तन परंपरा त्यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सांभाळली. गतवर्षीच्या महापुरातही त्यांचे निवासस्थान श्रीराम निकेतन पाण्यात असतांना त्यांनी कीर्तनसेवेत खंड पडू दिला नाही.

२३ सप्टेंबर या दिवशीही त्यांनी नेहमीप्रमाणे कीर्तन केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा दीपक, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. पू. चंद्रशेखर (अण्णा) रामराय केळकर महाराज यांच्या जाण्याने सहस्रो भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.

 

सनातन संस्थेशी विशेष स्नेह !

पू. चंद्रशेखर (अण्णा) केळकर महाराज यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी विशेष स्नेह होता. सनातन संस्थेच्या साधकांवरही त्यांचे विशेष प्रेम होते. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या अनेक उपक्रमांना त्यांचे आशीर्वाद असे. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने काढणार्‍या फेरीच्या प्रारंभी श्रीफळ वाढवण्यासाठी ते आवर्जून उपस्थित रहात ! दैनिक सनातन प्रभातचे ते अनेक वर्षे नियमित आणि आवडीने वाचन करत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment