सिंधुदुर्ग – चक्रीवादळ, पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती, तर कोरोनासारखे मानवनिर्मित संकट यांमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. यासह रस्त्यांवरील अपघात, आकस्मिक दुर्घटना घडत असतात. यांमध्ये होणारे बहुतांश मृत्यू रुग्णाला वेळीच प्रथमोपचार न मिळाल्याने होतात. सध्याच्या काळात वाढती गुन्हेगारी, हिंसाचार, दंगली, अपघात, आतंकवाद पहाता आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि समाजबांधव यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ‘ऑनलाईन’ कार्यशाळेतून प्रथमोपचाराच्या विविध पद्धती शिकूया आणि इतरांनाही शिकवूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योत्स्ना नारकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ सप्टेंबरला या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याचा १८० धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
या वेळी सौ. नारकर म्हणाल्या, ‘‘इंग्लंडने दुसर्या महायुद्धाच्या काळात देशातील नागरिकांनो ठिकठिकाणी सोप्या शब्दांत माहिती दिली होती. प्रथमोपचाराची विशेष पथके उभारली होती. त्यामुळे वेळीच झालेल्या प्रथमोपचारांमुळे सैनिकांना पुन्हा युद्धसज्ज होता आले. सध्या जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशा वेळी आपण प्रथमोपचार शिकून घेतल्यास येत्या युद्धकाळात आपणाला राष्ट्रकार्यात योगदान देता येईल.’’

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !