सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. अधिक मासात ज्ञानदानाला विशेष महत्त्व !
१८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात ‘अधिक मास’ आहे. ‘अधिक मासात मंगलकार्ये न करता विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत’, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. या मासात दान केल्यास त्याचे अधिक पटींनी फळ मिळते. त्यामुळे या काळात वस्त्रदान, अन्नदान आणि ज्ञानदान करण्याला विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ‘ज्ञानदान करणे’, हे सर्वश्रेष्ठ मानले जात असल्याने अनेक जण यासाठी प्रयत्नरत असतात.
२. सनातन संस्थेची सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे ज्ञानदान करण्याचे सर्वोत्तम माध्यम !
सनातन संस्थेची बहुविध आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे चिरंतन ज्ञानाचा अनमोल ठेवा ! सनातन संस्थेने अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, धर्माचरण, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आपत्काळात जीवित रहाण्यासाठी उपाय आदी विषयांवरील ३२४ ग्रंथ आणि लघुग्रंथ प्रकाशित केले आहेत. हे ग्रंथ सहजसोप्या भाषेत वाचकांना अमूल्य ज्ञान देतात, तसेच धर्माप्रती श्रद्धाही वाढवतात. त्यामुळे अधिक मासात अशा ग्रंथदानाद्वारे ज्ञानदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्यावा.
इतरांना देण्यासाठी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास त्यांची मागणी लवकरात लवकर स्थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com या मार्गिकेला भेट द्यावी.
साधकांनी वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना विविध विषयांवरील ग्रंथांची माहिती ‘व्हॉट्सअॅप’वरून पाठवावी आणि त्यांच्या आवडीनुसार ग्रंथ निवडण्यास सांगावे. |



श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !