आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ बैठक

कोल्हापूर – श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक २९ जुलै या दिवशी पार पडली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. या बैठकीला विविध मंडळांचे ४० कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र आणि आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी मार्गदर्शन केले. सौ. राजश्री तिवारी यांनी ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत गणेशोत्सव भक्तीभावाने करण्यासाठी मूर्तीचा आकार लहान ठेवावा. पूजासाहित्य न मिळाल्यास उपलब्ध साहित्यामध्ये भक्तिभावाने पूजन करावे. घरगुती पद्धतीचा, कोरडा प्रसाद वापरू शकतो. दळणवळण बंदीमुळे लहान मूर्ती असल्यास अल्प जणांच्या साहाय्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यांचे नियोजन करू शकतो.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment