५ ऑगस्ट या दिवशी श्रीराममंदिर भूमीपूजनाच्या निमित्त कृतज्ञता उत्सव साजरा करून श्रीरामाची कृपा संपादन करूया !

श्रीरामभक्त, देशभक्त आणि धर्मप्रेमी यांना आवाहन !

‘प्रभु श्रीरामाच्या कृपेने ५ ऑगस्ट या दिवशी अयोध्येत श्रीराममंदिराचे भूमीपूजन होणार आहे. श्रीराममंदिराचे अधिष्ठान हा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील मैलाचा दगड आहे. ही घटना म्हणजे हिंदूंसाठी आनंदाची पर्वणीच आहे, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, आपल्या प्राणांचे बलीदान दिले, त्यांचे स्मरण करण्याचा हा क्षण आहे. या दिवशी सर्वांनी पुढील प्रकारे हा कृतज्ञता उत्सव साजरा करून प्रभु श्रीरामाची कृपा संपादन करूया.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

अ. कोरोनाच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शक्य असल्यास आपल्या घरावर भगवा ध्वज फडकवावा.

आ. सकाळी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यापुढे तेलाचा दिवा लावावा.

इ. सायंकाळी घरापुढे तेलाचे दोन दिवे लावून रामरक्षा पठण करावे.

ई. घरापुढे रामतत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी काढावी. (रांगोळी येथे दिली आहे. )

श्रीरामाचे तारक तत्त्व आकृष्ट करणारी सनातनची सात्त्विक रांगोळी ११ ठिपके ११ ओळी

उ. दिवसभरात कुटुंबातील सदस्यांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप अधिकाधिक करावा. (या जपाचा ऑडिओ https://www.sanatan.org/mr/chant-shriram या लिंकवर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ या अ‍ॅपवर उपलब्ध आहे.)

ऊ. प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र लवकर अवतरण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करावी.

ए. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आदी सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा ‘डीपी’ (डिस्प्ले पिक्चर) ठेवून अधिकाधिक श्रीरामभक्तांना असे करण्याचे आवाहन करावे.’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment