अयोध्येतील श्रीराममंदिर भूमीपूजन निमित्त सनातन संस्थेच्या साधकांकडून ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव चंपत राय यांची भेट

कैलास पर्वत, कैलास चरणस्पर्श, कैलास गौरीकुंड येथील माती आणि मानस सरोवराचे जल श्रीचित्‌शक्‍ति
(सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव चंपत राय यांच्याकडे सुपुर्द !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

अयोध्या (उत्तरप्रदेश) – सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आदेशानुसार सनातन संस्थेच्या वतीने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान केले. त्यांनी अयोध्येतील कारसेवकपूरम् येथे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव श्री. चंपत राय यांच्याकडे हे अर्पण सुपुर्द केले. या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी कैलास पर्वत, कैलास चरणस्पर्श, कैलास गौरीकुंड येथील माती आणि मानस सरोवराचे जलही श्री. चंपत राय यांच्याकडे सुपुर्द केले.

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव श्री. चंपत रायजी यांच्याकडे अर्पण सुपुर्द करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक पवित्र नद्यांचे तीर्थ आणि विशेष स्थानांची माती अयोध्येत येत आहे. श्री. चंपत राय यांनी ३१ जुलै या दिवशी भारतभरातून आलेले पवित्र तीर्थ आणि माती श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दाखवली. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या सर्वांचे भावपूर्ण दर्शन घेतले. अयोध्या भेटीच्या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ शरयू नदीच्या आरतीलाही उपस्थित राहिल्या. या वेळी त्यांच्या समवेत हिंदुत्वनिष्ठ वैद्य रामप्रकाश पांडे हेही उपस्थित होते.

भूमीपूजनासाठी भारतभरातून आलेले पवित्र तीर्थ आणि माती यांचे भावपूर्ण दर्शन घेतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीरामजन्मभूमी शेकडो वर्षे राममंदिराच्या प्रतीक्षेत आहे. दैवी योजनेनुसार तो क्षण जवळ आला आहे. कोरोनामुळे दळणवळणाची साधने मर्यादित असतांना आणि बाह्य प्रतिकूलतेमुळे वस्तूंची उपलब्धता होणे कठीण असतांनाही या श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी अर्पण देण्याचे सौभाग्य मिळणे, ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व साधक यांच्या वतीने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ अयोध्या येथे उपस्थित आहेत. सनातन संस्थेला या भव्य ईश्‍वरी कार्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे, यासाठी प्रभु श्रीराम आणि महर्षि यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment