
डोंबिवली – ‘महाराष्ट्र ज्योतिष परिषदे’चे संस्थापक आणि प्रसिद्ध ज्योतिर्विद्यावाचस्पति श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे २५ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी दीर्घकाळ ज्योतिष शिक्षण, अध्यापन आणि विपुल लेखन केले. त्यांनी ‘ज्योतिष सोबती’, ‘ज्योतिषाच्या गाभार्यात’, ‘भाग्याचे दीपस्तंभ’ आणि ‘सर्व सुखाचे आगरू’, या पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी काही वर्षांपूर्वी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली होती. सनातनच्या कार्याला त्यांचा पाठिंबा होता. महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणाविरोधी विधेयकातील हिंदुविरोधी कलमांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला पाठिंबा देत भट यांनी त्यात सहभाग घेतला होता. सनातन परिवार भट यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
श्री.श्री. भट यांचे कार्य अनेक पिढ्यांसाठी ते
दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील ! – सौ. प्राजक्ता जोशी
आदरणीय श्री.श्री. भट हे ज्योतिष क्षेत्रातील अर्ध्वयु होते. त्यांचे कार्य चिरंतन असून पुढील अनेक पिढ्यांसाठी ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील. त्यांच्याशी वैयक्तिक आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून ऋणानुबंध होते. ज्योतिषशास्त्रावर कुणाशीही अधिकारवाणीने बोलणारी व्यक्ती आज आपल्यातून गेली आहे. ज्योतिषशास्त्राची आणि वैयक्तिक प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाची अपरिमित हानी झाली आहे.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...