साधनेद्वारे आत्मबलळ जागृत करून ‘नवीन भारता’च्या निर्माणासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ऑनलाईन ‘पत्रकार संवाद’ कार्यक्रमामध्ये १० राज्यांतील पत्रकारांचा सहभाग

वाराणसी (उत्तरप्रदेश) – पत्रकारांचा थेट संबंध राष्ट्रजीवनाशी असल्याने समाज आणि राष्ट्र यांच्या दृष्टीने पत्रकारांचे दायित्व महत्त्वपूर्ण मानले जाते. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर समाजामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीमध्ये पत्रकारांनाही आर्थिक समस्या आणि मानसिक तणाव यांचा सामना करावा लागत आहे. ईश्‍वराच्या स्मरणामुळे आत्मबळ जागृत होते आणि मन सकारात्मक होऊन तणावातून बाहर पडता येणे शक्य होते. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाने साधनेद्वारे आत्मबळ जागृत करून ‘नवीन भारता’च्या निर्माणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यानं केले. ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून २५ जुलै या दिवशी ‘वर्तमानकाळातील स्थितीमध्ये पत्रकारांमधील वाढता तणाव आणि उपाययोजना’ याविषयावर पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन ‘पत्रकार संवादा’मध्ये बोलत होते. या कार्यक्रमामध्ये देहली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, राजस्थान, मध्यप्रदेश, बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांतील पत्रकार आणि संपादक उपस्थित होते.

 

श्री. चेतन राजहंस यांनी मांडलेली सूत्रे

चेतन राजहंस

१. मन अनुकूल परिस्थिती लगेच स्वीकारते; मात्र प्रतिकूल परिस्थिती लगेच स्वीकारत नाही. परिस्थिती तणावयुक्त असते, तेव्हा व्यक्ती स्वतःच्या गुण-दोषांनुसार त्या प्रसंगाकडे कोणत्या दृष्टीने पहाते, यावर तणावाची स्थिती निर्माण होते.

२. स्वयंसूचनांचा उपयोग करून या तणावाच्या स्थितीतून बाहेर पडता येऊ शकते. आपल्या जीवनामध्ये तणावातून बाहेर पडण्यासाठी प्रथम आपले स्वभावदोष कोणते आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे.

३. स्वभावदोषांमुळे शारीरिक आणि मानसिक रोग होतात. चिंता करण्याचा स्वभाव असेल, तर रक्तदाब, पित्त, निद्रानाश यांसारखे शारीरिक विकार आणि निराशा अन् व्यसन यांसारखे  मानसिक विकार होतात. स्वयंसूचना देऊन आपण या तणावातून बाहर पडू शकतो.

स्वयंसूचना सहित नामजपासारखे आध्यात्मिक उपाय केल्याने ईश्‍वराची आपल्यावर कृपा होते. संकटकाळात ईश्‍वराची कृपा महत्त्वपूर्ण आहे. ईश्‍वराच्या स्मरणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपण संकटातून बाहर येऊ शकतो.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे प्रवक्ते श्री. आनंद जाखोटिया यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना, तसेच सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रामध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांची उत्तरे समितीचे पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे आणि संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी देऊन शंकानिरसन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment