सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र दळणवळण बंदी लागू आहे. त्यामुळे या वर्षी प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करता येणार नसला, तरी श्रीगुरूंच्या कृपेमुळे आपल्याला जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या या पर्वणीचा लाभ मिळणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिनी १ सहस्र पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ होण्यासाठी या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा. गुरु हे तत्त्व आहे, त्यामुळे आपण या गुरुतत्त्वाचा लाभ कुठेही असलो, तरी तो आपल्याला घेता येणार आहे.

रविवार, ५ जुलै २०२० (आषाढ पौर्णिमा)

कार्यक्रमाचे स्वरूप

  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन
  • श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन (गुरुपूजन)
  • व्हिडिओ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयीचे मार्गदर्शन (संग्रहित)
  • व्याख्यान : आपत्काळातील हिंदूंचे कर्तव्य आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा

या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली, पंजाबी, ओडिया या ११ भाषांत आयोजन !

आपल्या भाषेतील कार्यक्रमाची लिंक आणि त्याच्या प्रसारणाची वेळ पहाण्यासाठी पुढील लिंकवर भेट द्या !

www.sanatan.org/en/gurupurnima

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment