काळाची पावले ओळखून उद्योगपतींनी त्यांचे धोरण ठरवावे ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

देहली – सध्या देशासमोर असलेला संकटकाळ असो किंवा ‘हलाल सर्टिफिकेशन’सारख्या षड्यंत्रामुळे हिंदूंच्या आर्थिक स्थितीवर आलेले संकट असो, अशा परिस्थितीमध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करणार्‍या उद्योगपतींनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता आहे. या दृष्टीने उद्योगपती परिषद प्रयत्न करतच आहे. यात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ उद्योगपती संमेलन नुकतेच झाले. त्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या संमेलनाचा देहली, मध्यप्रदेश, राजस्थान, फरिदाबाद आणि महाराष्ट्र येथील ४० हून अधिक उद्योगपतींनी लाभ घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी उपस्थित उद्योजकांना ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले.

 

काळाची पावले ओळखून उद्योगपतींनी त्यांचे धोरण ठरवावे ! – चेतन राजहंस

येणारा काळ भीषण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना त्याचे भान असणे आवश्यक आहे. उद्योजक राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. जर त्यांनी काळानुसार त्यांचे धोरण ठरवले, तर ते निश्‍चितच कठीण परिस्थितीत स्वत:सह राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे; परंतु स्वयंसूचना इत्यादी उपायांनी आपण त्यावर निश्‍चित मात करू शकतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment