‘ओळख संतांची..’ या ‘फेसबूक लाईव्ह’ कार्यक्रमामध्ये उलगडले ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अलौकिक कार्य !’

जबलपूर येथील ‘आषाढी कार्तिकी वारी महामंडळा’चा स्तुत्य उपक्रम !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील ‘आषाढी कार्तिकी वारी महामंडळा’द्वारे प्रतिवर्षी वारी सोहळा अत्यंत चांगल्या रितीने साजरा होतो. सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे वारी सोहळा संभव नसल्याने ‘ओळख संतांची..’, या विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जीवन चरित्र आणि अलौकिक कार्य’, या विषयावर २२ जून या दिवशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी यासंबंधी विचार व्यक्त केले.

त्यासह श्री. राजहंस यांनी श्री विठ्ठल, वारी यांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडलेले शास्त्रीय ज्ञान ही उपस्थितांना अवगत केले. अनेक दर्शकांनाही हा कार्यक्रम अतिशय भावला. आषाढी कार्तिकी वारीच्या ‘फेसबूक ग्रुप’वर अनेकांनी स्वतःचा प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमासाठी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे संयोजक श्री. संतोष गोडबोले यांचे सहकार्य लाभले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment