जून आणि जुलै मासांतील ३ ग्रहणांपैकी केवळ २१.६.२०२० या दिवशी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार

‘सध्या प्रसारमाध्यमांद्वारे ‘जून आणि जुलै मासांत ३ ग्रहणे (५.६.२०२०, २१.६.२०२० आणि ५.७.२०२० या दिवशी) येत असल्याने नैसर्गिक आपत्ती येतील. सावध रहा’, यांसारखे संदेश प्रसारित होत आहेत. त्यामुळे अनेक जणांमध्ये संभ्रम आणि भीती यांचे वातावरण निर्माण होत आहे.

 

१. वस्तूस्थिती

अ. या ३ ग्रहणांपैकी केवळ ज्येष्ठ अमावास्या, रविवार २१.६.२०२० या दिवशी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे.

आ. ५.६.२०२० या दिवशी असणारे चंद्रग्रहण ‘छायाकल्प’ आहे. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्रबिंबाला प्रत्यक्ष ग्रहण न लागता चंद्रबिंब पृथ्वीच्या अंधुक आणि अस्पष्ट छायेत प्रवेश करते. ‘छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत’, असे असल्यामुळे या ग्रहणांचे नैसर्गिक आणि जन्मराशी इत्यादीनुसार होणारे परिणाम विचारात घ्यायचे नसतात.

इ. आषाढ शुक्ल पक्ष पौर्णिमा, म्हणजे गुरुपौर्णिमा, रविवार ५.७.२०२० या दिवशी होणारे कुमारी चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे या ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.

ई. गर्भवती स्त्रियांनीही ५.६ आणि ५.७.२०२० या दिवशी होणार्‍या चंद्रग्रहणांचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

उ. २१.६.२०२० चे सूर्यग्रहण भारतात दिसणार असल्याने गर्भवती स्त्रियांनी आणि सर्व लोकांनी या ग्रहणाचे वेधादि नियम पाळावेत.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ‘ज्योतिष फलित विशारद’, ज्योतिष विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (३०.५.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment