गरम पाण्यात मीठ घालून केलेल्या गुळण्यांमुळे कोरोनाचा धोका न्यून होतो ! – ब्रिटनमधील संशोधनाचा निष्कर्ष

जे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून सांगितले आहे, त्यावर पाश्‍चात्त्य वैज्ञानिक आता संशोधन करून त्याला मान्यता देत आहेत. यावरून ते किती मागास आहेत, हे लक्षात येते आणि पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणारे भारतीय स्वतःला किती मागास समजत होते, हेही लक्षात येते !

 

नवी देहली – कोरोनाविषयी आयुष मंत्रालयाने केलेल्या अनेक सूचनांमध्ये गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करण्याच्या सूचनेचाही समावेश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुळण्या करण्याची पद्धत प्राचीन आहे. आता ब्रिटनमधील एडिनबर्ग विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून ‘गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यामुळे कोरोनाचे संक्रमण बर्‍याच प्रमाणात न्यून होण्यासह त्याच्या संक्रमणाचा कालावधीही अल्प होऊ शकतो’, असा निष्कर्ष काढला आहे.

( ‘जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थ’ मधील अहवाल वाचण्यासाठी खालील चित्रांवर क्लिक करा )

   

१. या शास्त्रज्ञांनी कोरोनाबाधित ६६ रुग्णांवर १२ दिवस याचा प्रयोग केला. या रुग्णांना १२ दिवस गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करण्यास सांगण्यात आले. १२ दिवसांनंतर त्यांच्या नाकातील द्रवाचे नमुने घेतले असता त्यात कोरोनाच्या संक्रमणाची लक्षणे अत्यंत न्यून झाल्याचे आढळून आले.

२. ‘जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थ’ मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. यात पुढे म्हटले आहे की, ‘अडीच दिवसांतच कोरोनाच्या संक्रमणाचा प्रभाव न्यून झाला होता. त्यामुळे अल्प कालावधीत कोरोनाचे संक्रमण न्यून करता येऊ शकते.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment