- महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांची शासनाकडे मागणी
- ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या अंतर्गत ‘ऑनलाईन’ चर्चासत्र
- २२५ मंदिर विश्वस्त आणि मान्यवर उपस्थित
मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दळणवळण बंदीमध्ये दारूची दुकाने उघडण्यापेक्षा लोकांच्या श्रद्धा जपण्यासाठी चर्च उघडणे अत्यंत आवश्यक असल्याचे विधान नुकतेच केले. त्यांनी प्रशासनाला तसे निर्देशही दिले. संकटकाळामध्ये ‘श्रद्धा’ हीच समाजाचा आधार असते. आज समाजाला मद्याची नाही, तर श्रद्धेच्या आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतभरातील सर्व दारूंची दुकाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे (सामाजिक अंतराचे) नियम पाळून उघडली जाऊ शकत असतील, तर त्याच प्रकारे सर्व नियम पाळून हिंदूंची सर्व मंदिरेही तात्काळ उघडावीत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील बहुसंख्य मंदिरांच्या विश्वस्तांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून २९ मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्राला राज्यातील विविध मंदिरांचे २२५ विश्वस्त, मंदिरांचे पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी वरील मागणीचा ठराव करण्यात आला आणि तो शासनाकडे पाठवण्यात आला आहे, तसेच सर्व मंदिरांच्या वतीनेही शासनाला याविषयी पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे. भारताची राज्यघटना ‘निधर्मी’ असूनही शासन केवळ हिंदु मंदिरांचे व्यवस्थापन पहाते. केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे सरकार मशिदी, चर्च आदींचे सरकारीकरण करण्यापासून कचरते. सरकारीकरण केलेल्या मंदिरांची स्थिती अत्यंत भयावह आहे. अनेक मंदिरांत सरकारी समित्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, तसेच मंदिरांच्या परंपरा, धार्मिक कृती, पुजारी आणि अन्य प्राचीन व्यवस्था आदींमध्ये मनमानी पद्धतीने सरकारी हस्तक्षेप चालू आहे. या अनुषंगाने ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ठरवल्याप्रमाणे ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियान’ देशभरात आरंभले होते. या अभियानाच्या अंतर्गतच हे मंदिर विश्वस्तांचे ‘ऑनलाईन’ चर्चासत्र पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शंखनादाचा आणि वेदमंत्रपठणाचा ‘ऑडिओ’ ऐकवण्यात आला.
या वेळी श्री. घनवट म्हणाले,‘‘हिंदूंची सर्व मंदिरे केवळ भक्तांच्याच कह्यात असावीत, हासुद्धा या लढ्यातील भाग आहे. मंदिर विश्वस्तांचे होणारे हे कृतीशील संघटन नक्कीच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने मार्गक्रमण करील, असा विश्वास वाटतो.’’ ‘मंदिरांचे विश्वस्त आणि मंदिर क्षेत्रात कार्य करणारे यांनी एक मासातून किमान एकदा तरी जिल्हास्तरावर एकत्र यायला हवे’, असे मंदिर विश्वस्तांनी या वेळी सूचित केले.
मंदिर सरकारीकरणासाठी अजून किती मंदिरांचा
बळी दिला जाणार आहे ? – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
मंदिरे ही आमची संस्कृती आणि हिंदूसंघटनाच्या दृष्टीने एक मोठे व्यासपीठ आहे. मंदिराकडे केवळ एक धर्मस्थळ म्हणून न पहाता धर्मकार्याचे अभियान म्हणून पहाण्याची आवश्यकता आहे. मंदिरात भाविकांकनी दिलेला अर्पणनिधी म्हणजे देवनिधीचा विनियोग मंदिरातील धार्मिक कृत्ये, मंदिरांचा जीर्णोद्धार, सनातन धर्माचा प्रसार आणि सत्कार्य यांसाठी व्हायला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आपल्या धर्मशास्त्रात दिले आहेत; मात्र सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या निधीचा वापर सरकार विकासकामे आणि आपत्तीनिवारण यांसाठी करत आहे. धर्माच्या दृष्टीने हा व्यय राजकोषातून झाला पाहिजे. राजकोष लुटणारे आतापर्यंतचे शासनकर्ते मंदिरातील पैसे लुटण्याची भाषा करत आहेत. मध्यंतरी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘मंदिरातील निधी हा कोरोना आपत्तीसाठी वापरा’, असे केलेले विधान हे याचेच लक्षण आहे. भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता यांमुळे देशभरात विविध सरकारी आस्थापनांचे खासगीकरण होत असतांना आपल्या मंदिरांचे मात्र सरकारीकरण होत आहे. मंदिर सरकारीकरणासाठी अजून किती मंदिरांचा बळी दिला जाणार आहे ? सरकार नियंत्रित मंदिरांची सर्वत्र होणारी लुटालूट थांबवण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन हे मंदिर संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने झाले पाहिजे.
मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन
निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच. मोठ्या प्रमाणात निधी येणारी मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत आणि हे पैसे इतर कामांसाठी वापरले जात आहेत. माहिती अधिकाराद्वारे प्राप्त माहितीतून सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये शेकडो कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार, भूमीचे अपव्यवहार, दागिन्यांची चोरी आदी अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत. आपल्या मंदिरांविषयी कुणीही चुकीचे वक्तव्य करण्यास धजावणार नाही आणि वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य करणार नाही, असे प्रभावी संघटन झाले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...