मुंबई, ठाणे, रायगडसह गुजरात येथील उद्योजकांचा सहभाग
मुंबई – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील उद्योजकांसाठी २१ मे या दिवशी ‘ऑनलाईन कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या संकटकाळात आध्यात्मिक बळ असण्याचे महत्त्व काय ?, ते कसे वाढवावे ?, व्यावसायिक जीवनात साधना करून आनंद कसा मिळवू शकतो ?, साधनेचे महत्त्व काय ?, यांविषयी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी, तर मंदिरांचे महत्त्व, मंदिरांची सद्य:स्थिती आणि सरकारची नीती या सूत्रांवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात उद्योग करत असतांना राष्ट्र-धर्म कार्यात प्रत्यक्ष कृतीद्वारे कसे योगदान देऊ शकतो ?, याविषयी समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी सांगितले. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ३३ उद्योजक सहभागी झाले होते.

सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !