व्हिएतनाममध्ये उत्खननात ९ व्या शतकातील शिवलिंग सापडले !

हानोई (व्हिएतनाम) – व्हिएतनाम येथील माई सोन मंदिर परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात वाळूच्या दगडापासून बनवलेले एक मोठे प्राचीन शिवलिंग सापडले आहे. याची माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीट करून दिली आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून हे उत्खनन करण्यात आले. हे शिवलिंग ९ व्या शतकातील असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वीही या मंदिर परिसरात करण्यात आलेल्या उत्खननामध्ये अनेक मूर्ती सापडल्या आहेत. या मंदिरामध्ये भगवान विष्णु, कृष्ण आणि शिव यांच्या मूर्ती आहेत. सध्या हे मंदिर दुर्लक्षित आहे आणि त्याची पडझडही झालेली आहे. हे मंदिर प्राचीन काळातील चंपा राजांनी बांधले होते. चंपा राजांचे १८ व्या शतकापर्यंत व्हिएतनाममध्ये शासन होते. येथील जनता हिंदु होती; मात्र नंतर त्यांनी बौद्ध आणि इस्लाम धर्म स्वीकारला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment