रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !

रामजन्मभूमीवर राममंदिर नव्हते, असे म्हणणारे आता तोंड का उघडत नाहीत ?

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, ७ ब्लॅक टच स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे.

( सौजन्य: एबीपी न्यूज )

 

मूर्ती आणि शिवलिंग सापडणे हे हिंदूंना तालिबानी
म्हणणार्‍या मुसलमान पक्षकारांना उत्तर ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना मुसलमान पक्षाने आमच्यावर हिंदु तालिबान असल्याचा आरोप केला होता, तसेच या ठिकाणी कोणत्याही मंदिराचे अवशेष सापडले नसल्याचेही म्हटले होते. आता सापडलेल्या पुरातन मूर्ती या त्यांच्या आरोपांना उत्तर आहेत, असे हिंदू महासभेचे रामजन्मभूमी खटल्यातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले.

अधिवक्ता जैन पुढे म्हणाले की, रामजन्मभूमी परिसरात अनेक मंदिरांचे अवशेष असल्याचे आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोरही सांगितले होते. याआधाही खोदकाम चालू असतांना पुरातत्व विभागाला एक शिवलिंग आढळले होते. पुरातत्व विभागाच्या अहवालातही या परिसरात मंदिरांचे अनेक अवशेष असल्याचे म्हटले आहे. बाबरी मशिदीच्या खाली राममंदिराची मोठी रचना होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले म्हणणे किती खरे होते, हे आज मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment