देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा

 

१. प्रवचन

‘देहलीमध्ये अलकनंदा क्षेत्रातील श्री संतोषीमातेच्या मंदिरात होळीच्या निमित्ताने एक प्रवचन करण्यात आले.

 

२. ‘नववर्ष गुढीपाडव्याला साजरा करण्याचे महत्त्व’ यासंदर्भात माहिती सांगणारी प्रवचने

फरिदाबाद येथील सैनिक कॉलनीमध्ये पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका श्रीमती सुमन राणा यांच्या घरी आणि ‘एन्.आय.टी. ५’ येथील शिवमंदिर येथे गुढी उभी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच ‘नववर्ष चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला का साजरे करायचे ? धर्मध्वजाची स्थापना कशी करायची ? गुढी उभी केल्याने काय लाभ होतो ?’, याविषयीची माहिती प्रवचनातून देण्यात आली.

 

३. ग्रंथप्रदर्शन

देहली येथील भैरव मंदिराकडे जाणार्‍या विनय मार्गावर सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू यांचे प्रदर्शन लावले होते. या ग्रंथप्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.’ – कु. मनीषा माहूर, सनातन संस्था, देहली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment