युवकांनो, ईश्‍वराचा भक्त होण्यासाठी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर – सध्याच्या आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. सध्याची स्थिती पहाता आपत्काळाला प्रारंभ झाला असून पुढील २ वर्षे आणखी कठीण काळ असणार आहे. भगवंताने साधना करण्यासाठी आपल्याला जन्माला घातले आहे. त्यामुळे भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधना करा. शाळा आणि महाविद्यालये कधी चालू होतील ?, हे ठाऊक नाही. घरात पैसे आहेत; पण दळणवळण बंदीमुळे त्याच्या वापरावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे आता वेळ न दवडता किंवा बुद्धीने कोणताही विचार न करता साधनेला प्रारंभ करून ईश्‍वराचा भक्त होण्यासाठी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय करा !, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

४ मे या दिवशी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील युवा साधकांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली. त्यात त्या बोलत होत्या. या कार्यशाळेला २५० युवा साधक सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment