‘वादळ, भूस्खलन, भूकंप, महापूर, दळणवळण बंदी अशी आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा स्थितीत अत्तर, कापूर, उदबत्ती, गोमूत्र आदी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने उपलब्ध होणार नाहीत. अशा वेळी साधक पुढीलप्रमाणे मानस-उपाय करू शकतात.

१. मानस-उपाय करण्याचे महत्त्व !
आपत्कालीन स्थितीत उपायांची साधने उपलब्ध नसतांना मानस-उपाय करणे सहज शक्य आहे. हे उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपाय केल्याने जेवढा लाभ होतो, तेवढा लाभ होतो.
२. अत्तर, कापूर आणि उदबत्ती यांनी मानस-उपाय कसे करावेत ?
अत्तर, कापूर, उदबत्ती आदी उपलब्ध असतांना त्यांद्वारे साधक जसे उपाय करतात, तसे उपाय ही उत्पादने नसतांनाही करता येतील. ‘एरव्ही उपाय करतांना ज्या कृती करतो, त्या आताही करत आहोत’, असा भाव ठेवून मानसरित्या उपाय करावेत.
३. मानसरित्या स्वतःवरचे आवरण काढावे.
४. वास्तूशुद्धी कशी करावी ?
घरात गोमूत्र उपलब्ध नसल्यास वास्तूशुद्धीसाठी पुढील उपाय करता येईल. एका पेल्यात थोडे पाणी घ्यावे. त्यावर उजवा हात ठेवून सध्या समष्टी स्तरावरील त्रास दूर करण्यासाठीचा ‘निर्गुण’ हा नामजप १० मिनिटे करावा. नामजपामुळे भारित झालेले पाणी शिंपडून वास्तूशुद्धी करू शकतो. घरात मासिक धर्म चालू असलेली महिला असल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला सुवेर किंवा सुतक असल्यास तिने हा उपाय स्वतः न करता अन्य साधकांनी करावा.
साधकांनो, ‘मानस-उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपायांप्रमाणेच त्यांचा लाभ होणार आहे’, अशी श्रद्धा ठेवून हे उपाय करा !’
– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...