कार्यालयातून घरी गेल्यावर पाळायची सूत्रे
१. कार्यालय सोडण्याआधी घरी दूरध्वनी करून कळवा.
२. घरातील कुणीतरी समोरचा दरवाजा उघडा ठेवावा, जेणेकरून दारावरची घंटा अथवा दाराचे हँडल यांना हात लावण्याची घरातून बाहेर गेलेल्या संबंधित सदस्याला आवश्यकता भासू नये. तसेच दाराबाहेर एक बालदी पाणी आणि धुण्याच्या साबणाची पूड अथवा ब्लिचिंग पावडर हे साहित्य ठेवलेले असावे.
३. स्वतःजवळील वाहनाच्या चाव्या, पेन, सॅनिटायझर बाटली, दूरध्वनी उपकरण इत्यादी साहित्य दाराबाहेर ठेवलेल्या एका डब्यात टाकावे.
४. बालदीतील पाण्यात हात धुवावे आणि त्या पाण्यात थोडा वेळ उभे राहावे. या कालावधीत टिशू पेपर आणि सॅनिटायझरने डब्यात ठेवलेले साहित्य पुसून काढावे.
५. परत एकदा स्वतःचे हात साबणाच्या पावडरने धुवावे.
६. नंतर घरातील कुठल्याही वस्तूला स्पर्श न करता घरात प्रवेश करावा.
७. घरातील कुणीतरी स्वच्छतागृहात एका बालदीत डिटर्जंट पावडर टाकलेले पाणी ठेवावे आणि स्वच्छतागृहाचे दार उघडेच ठेवलेले असावे. बाहेरून आलेल्या व्यक्तीने स्वतः घातलेल्या अंतर्वस्त्रांंसह सर्व कपडे त्या बालदीत भिजत ठेवावे.
८. नंतर साबण आणि शाम्पू यांचा वापर करून डोक्यावरून स्वच्छ स्नान करावे.
९. स्वतःचे कपडे हाताने अथवा वॉशिंग मशीनमध्ये टाकून गरम पाण्याने धुवावे आणि ते सूर्यप्रकाशात वाळत घालावेत.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !