दिवे लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही सहभाग

आपत्काळरूपी तमोगुणी अंधःकारात लखलखले दीपज्योतीचे तेज

मुंबई – अंधकाररूपी कोरोनाच्या लढाईत देशवासियांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी, यासाठी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे विजेचे दिवे बंद करून पणती, मेणबत्ती किंवा विजेरी (टॉर्च) लावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. रात्रीच्या अंधारात लक्षावधी दिव्यांमुळे आसमंत उजळून गेला. घराची गच्ची, अंगण, दरवाजा, खिडकी आदी ठिकाणी नागरिकांनी दिवे लावून प्रार्थना केली.

दादर येथे घराबाहेर दीप प्रज्वलित करतांना समितीचे कार्यकर्ते

मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली. देशवासीय संघटितपणे तेजाची आराधना करत असल्याने सकारात्मक ऊर्जा वातावरणात अनुभवायला मिळाली. याप्रमाणेच जळगाव, अमरावती येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या बाहेरही दीप लावण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment